AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाखो चाहत्यांची क्रश, हानिया आमिरच्या त्या व्हिडीओमुळे एकच खळबळ, चाहत्यांनी उपस्थित केले प्रश्न

लाखो चाहत्यांची क्रश असणारी पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर सध्या तिच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. नेमकं व्हिडीओमध्ये काय?

लाखो चाहत्यांची क्रश, हानिया आमिरच्या त्या व्हिडीओमुळे एकच खळबळ, चाहत्यांनी उपस्थित केले प्रश्न
| Updated on: Aug 24, 2026 | 1:37 PM
Share

पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमीर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये ती हेअरस्टायलिंग करताना आणि काहीशी मजेशीर व खेळकर मूडमध्ये दिसत आहे. मात्र, तिच्या अडखळत बोलण्यामुळे आणि काही वेळा झोपाळू अवस्थेसारख्या दिसणाऱ्या हावभावांमुळे सोशल मीडिया युजर्समध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

व्हायरल क्लिपमध्ये हानिया तिच्या स्टायलिस्टला केस व्यवस्थित करण्यास सांगताना दिसते. तसेच खरे केस झाकून विगच्या मदतीने ड्रामॅटिक लूक देण्याबाबतही ती बोलताना दिसते. हॅलोविनच्या निमित्ताने ती हा मजेशीर लूक करत असल्याचे दिसून येते. तिच्या बोलण्याच्या आणि वागण्याच्या पद्धतीमुळे काही युजर्सनी ती नशेत असल्याचा दावा केला आहे. काहींनी तर अमली पदार्थांचे सेवन किंवा ओव्हरडोज झाल्याचेही अंदाज व्यक्त केले आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय?

मात्र, या दाव्यांना सध्या कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हानिया आमीरने अमली पदार्थांचे सेवन केले होते किंवा तिचा ओव्हरडोज झाला होता असे सिद्ध करणारे कोणतेही अधिकृत निवेदन किंवा विश्वसनीय माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे केवळ व्हिडिओतील तिच्या बोलण्यावरून ती नशेत होती, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.

या व्हिडिओवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही युजर्सनी तिच्या वागण्यावर विनोद केले तर काहींनी अशा प्रकारचे आरोप पुराव्याशिवाय करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हानियाच्या व्हिडिओभोवती सध्या चर्चेपेक्षा अधिक तर्कवितर्कच पाहायला मिळत आहेत.

हानियाचा मोठा चाहता वर्ग

हानिया आमीर ही पाकिस्तानमधील लोकप्रिय अभिनेत्री असून भारतातही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर तिची लोकप्रियता मोठी असून तिचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असतात. यापूर्वीही गायक आसिम अझहरसोबतच्या तिच्या व्हायरल व्हिडिओंमुळे ती चर्चेत आली होती.

दरम्यान, हानिया आमीरने अभिनेता दिलजीत दोसांझसोबत ‘सरदार जी 3’ या पंजाबी चित्रपटात काम केले आहे. भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला नाही; मात्र परदेशातील बाजारपेठेत तो प्रदर्शित करण्यात आला.

सध्या हानियाच्या व्हायरल व्हिडिओवरून नशा किंवा ओव्हरडोजचे दावे सोशल मीडियापुरतेच मर्यादित असून, त्याला अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे कोणताही ठोस निष्कर्ष काढण्यापूर्वी अधिकृत माहितीची प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…