ऐश्वर्या अभिषेकसह शुटींग करत होती; तेव्हा सलमान खान सेटवर यायचा अन् तिच्यावर सतत चिडायचा; या अभिनेत्रीने केला खुलासा
एका अभिनेत्रीने ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या नातेसंबंधाबाबत एक धक्कादायक किस्सा उलगडला आहे. त्यांनी सांगितले की, सलमान नेहमी ऐश्वर्याच्या शुटींगच्या सेवर यायचा. तासंतास बसायचा. आणि कोणत्याही गोष्टीवरून तिच्यावर चिडायचा. तसेच या अभिनेत्रीने ऐश्वर्या आणि सलमानच्या ब्रेकअपवरही भाष्य केले आहे.

बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्तेत राहिलेली जोडी म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या रायची. आज जरी या दोघांचे मार्ग वेगळे असले आणि ते आपापल्या आयुष्यात खुश असले तरी देखील त्यांचे प्रेमाचे किस्से आजही चाहत्यांच्या आणि काही सेलिब्रिटींच्या चर्चेत असतात. दरम्यान एका मुलाखतीदरम्यान एका अभिनेत्रीने ऐश्वर्या राय आणि सलमान खानच्या अफेअरबद्दल सांगितले आहे.
सलमान खान ऐश्वर्याच्या चित्रपटाच्या शुटींगच्या ठिकाणी यायचा
या अभिनेत्रीने सांगितले की, सलमान खान ऐश्वर्याच्या चित्रपटाच्या शुटींगच्या ठिकाणी यायचा आणि चिडायचा,असे अनेक किस्से त्यांनी सांगितले आहेत. या अभिनेत्री म्हणजे हिमानी शिवपुरी. हिमानी शिवपुरी यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यांची प्रसिद्धी देखील तेवढीच आहे.
अभिनेत्रीने ऐश्वर्या रायसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले
एका मुलाखतीदरम्यान हिमानीने खुलासा केला की, त्या ऐश्वर्याला पहिल्यांदा ‘आ अब लौट चलें’ च्या सेटवर भेटली होती. नंतर, दोघांनी ‘हमारा दिल आपके पास है’, तसेच ‘उमराव जान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
सलमान दररोज रात्री सेटवर यायचा अन्
हिमानीने सांगितले की, त्यावेळी ऐश्वर्या बॉलिवूडमध्ये जास्त काम करत नव्हती आणि ते खूप जवळचे होते. त्यांनी हैदराबादमधील त्यांच्या शूटिंगमधील एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या की, “सलमान अनेकदा ऐश्वर्यासाठी सेटवर येत असे. तो काळ होता जेव्हा ऐश्वर्या आणि सलमान खूप चांगले मित्र होते, म्हणून सलमान दररोज रात्री सेटवर यायचा आणि शुटींग होईपर्यंत म्हणजे कधी कधी तर सकाळपर्यंत थांबायचा आणि सकाळी निघून जायचा.
“तिला समजावून सांगा. तिला वाटतं की ती खूप सुंदर आहे”
हिमानीने त्या काळाबद्दलही सांगितले जेव्हा सलमान अनेकदा एखाद्या गोष्टीवरून रागावायचा तेव्हा त्यांना मध्यस्थीची भूमिका बजावावी लागायची. त्या म्हणाल्या, “मला आठवते की एकदा आम्ही फिल्म सिटीमध्ये शूटिंग करत होतो. ऐश्वर्या अभिषेक बच्चनसोबत रोहन सिप्पीच्या चित्रपटाचे शूटिंग करत होती आणि सलमान तिथे आला. तो मला म्हणत होता, ‘ तिला काय झालंय? तिला समजावून सांगा. तिला वाटतं की ती खूप सुंदर आहे. म्हणून जास्त भाव खातेय तिला सांगा सुंदर म्हणजे काय यासाठी वहीदा रहमानकडे बघ.’ त्यावेळी मी त्याला शांत राहण्यास, गप्प राहण्यास सांगत असतं. त्याला समजावत असत.”
हिमानी यांनी ऐश्वर्याचे कौतुक केले
हिमानी यांनी सांगितले की ऐश्वर्या आणि सलमानच्या ब्रेकअपबद्दल बोलताना म्हटलं की, “त्यांच्यात काहीच जुळण्यासारखे नव्हते आणि याचे कारणही त्यांना माहित आहे. शिवाय, हिमानी यांनी ऐश्वर्याच्या सौंदर्याचे देखील कौतुक केले आणि तिला एक अद्भुत व्यक्ती म्हणून तिचे वर्णन केले.
