हुमा कुरेशीच्या भावाचा गेम कसा झाला? रात्रभर काय काय घडलं? पार्किंगमध्येच…
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या भावाच्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. आता हुमा कुरेशी हिच्या वडिलांनी या हत्येसंदर्भात अत्यंत मोठी माहिती दिली असून मध्यरात्री नेमकं काय घडलं हे त्यांनी सविस्तरपणे सांगितले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या भावाची हत्या करण्यात आली. दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये पार्किंगवरून हुमाचा भाऊ आसिफ कुरेशीची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. आता हुमा कुरेशी हिच्या वडिलांनी मध्यरात्री नेमके काय घडले हे सांगितले आहे. ज्यावेळी दिल्लीकर रात्री झोपायला जात होते, त्यावेळी ही घटना घडलीये. दिल्लीच्या निजामुद्दीन भागात ही हत्या झाली. हुमा कुरेशीच्या वडिलांनी थेट संपूर्ण घटनाक्रमच सांगून टाकलाय आणि आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केलीये.
मिळालेल्या माहितीनुसार, हुमा कुरेशीचा भाऊ आसिफ दररोजप्रमाणे आपल्या कामाहून घरी आला. यावेळी त्याने बघितले की, शेजाऱ्यांनी त्याच्या घराच्या दरवाजाबाहेरच स्कूटी लावली आहे. यानंतर त्याने शेजाऱ्यांना त्यांची स्कूटी काढण्यास सांगितली. मात्र, शेजाऱ्यांनी गाडी काढणे सोडा उलट याला शिव्या घालण्यास सुरूवात केली. यावेळी काही लोक देखील जमली. मात्र, काही कळण्याच्या आतच हुमाच्या भावावर दोघांनी हल्ला चढवला.
काही वेळातच हुमाचा भाऊ रक्तबंबाळ झाला. लोकांनी त्याला रूग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याचा जीव गेला. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेते घेतले आहे. आता याबद्दल बोलताना हुमा कुरेशी हिची वडील सलीम कुरेशी म्हणाले की, मी घरी झोपलो होतो आणि मला फोन आला की, आसिफची हत्या झालीये. दोन लोकांनी मिळून ही हत्या केली आहे. या लोकांसोबत त्याचा अगोदर वाद झाला आणि त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली.
स्कूटी हटवण्यावरून हा वाद झाला. आसिफला दोन पत्नी असून तो हॉटेलमध्ये चिकन सप्लाय करण्याचे काम करतो. त्याचे वय 42 आहे. दोषी कोणीही असो त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी हुमा कुरेशी हिच्या वडिलांनी केलीये. आसिफ हा हुमा कुरेशी हिचा चुलत भाऊ असून दिल्लीमध्ये त्यांची घर जवळच आहेत. पोलिसांकडून या हत्येचा तपास केला जात आहे. अचानक भांडण करताना ही हत्या झाली की, अगोदरच संपूर्ण कट रचण्यात आला होता, याची माहिती ही आता पोलिसांकडून घेतली जात आहे.
