AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Janhvi Kapoor | ‘चहापेक्षा किटली गरम’, सेल्फी मागणाऱ्या चाहत्याला जान्हवी कपूरच्या गार्डने रोखले!

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिची लेक आणि सध्याची आघाडीची अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. सध्या जान्हवी बाहेर पडून, आपल्या आगामी ‘रुही’ या चित्रपटाचे प्रमोशन करते आहे.

Janhvi Kapoor | ‘चहापेक्षा किटली गरम’, सेल्फी मागणाऱ्या चाहत्याला जान्हवी कपूरच्या गार्डने रोखले!
जाह्नवी कपूर
| Updated on: Mar 08, 2021 | 1:38 PM
Share

मुंबई : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिची लेक आणि सध्याची आघाडीची अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. सध्या जान्हवी बाहेर पडून, आपल्या आगामी ‘रुही’ या चित्रपटाचे प्रमोशन करते आहे. या दरम्यान प्रमोशनवरून परतल्यावर नुकतेच तिला मुंबई विमानतळावर स्पॉट केले गेले (Actress Janhvi kapoor staff member stopped fan while taking selfie).

फॅनच्या गरड्यात, जान्हवीचे मुंबई विमानतळावर स्वागत करण्यात आले. पापराझी फोटोग्राफरनी तिच्या वाढदिवसानिमित्त आणलेला केक देखील तिने यावेळी कापला. केक कापून झाल्यावर आपली आवडती अभिनेत्री पाहताच तिच्या भोवती चाहत्यांचा गदार पडला. अनेक चाहत्यांनी तिच्याबरोबर सेल्फी क्लिक करण्याचा प्रयत्न केला.

…आणि जान्हवी पुढे सरसावली!

View this post on Instagram

A post shared by Jasus Here (@jasus007)

(Actress Janhvi kapoor staff member stopped fan while taking selfie).

अशाच एका फॅनने जान्हवी कपूरसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला असता, जान्हवीच्या स्टाफ मेंबरने त्या व्यक्ती चक्क थांबवण्याचा प्रयत्न केला. तथापि, हे घडत असताना  जान्हवी थांबली आणि त्या चाहत्यासह फोटो देखील क्लिक केले. जान्हवीच्या कर्मचार्‍यांनी गर्दीत त्या माणसाचा हात खाली खेचल्यामुळे तिच्या आजूबाजूचे लोक क्षणभर आश्चर्यचकित झाले. मात्र, जान्हवीने स्वतःहून पुढे होत या सगळ्या प्रकरणाला व्यवस्थित हाताळले. तिने संपूर्ण परिस्थिती कशी हाताळली, यावरून नेटिझन्सनी जान्हवीचे कौतुक केले. तर, काहींनी ‘चहापेक्षा किटली गरम’ म्हणत तिच्या गार्डला फटकारले आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, जान्हवी सध्या पटियालामध्ये ‘गुड लक जेरी’ या आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. पंकज मट्टा यांची कथा असून सिद्धार्थ सेनगुप्ता दिग्दर्शित आनंद एल राय यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात दीपक डोबरियाल, मीता वशिष्ठ, नीरज सूद आणि सुशांत सिंह देखील आहेत (Actress Janhvi kapoor staff member stopped fan while taking selfie).

पहिल्यांदाच केले आयटम साँग!

अभिनेत्री जान्हवी कपूर एक चांगली डान्सर म्हणून ओळखली जाते. मात्र, जान्हवी ‘रुही’ चित्रपटात पहिल्यांदाच एक आयटम साँगवर  करताना दिसत आहे. ‘रुही’ चित्रपटातील ‘नदियों पार’ या आयटम साँगवर जान्हवीने जबरदस्त डान्स केला आहे. जान्हवीचे हे गाणे रिलीज होताच ट्रेंडिंग होत आहे.

जान्हवीचे हे गाणे बघितल्यानंतर चाहते घायाळ झाले आहेत आणि तिचे कौतुकही करत आहेत. हे गाणे सचिन-जिगर यांनी रीकंपोज केले आहे. हे मूळ गाणे रश्मित कौर आणि शामूर यांनी गायले होते. जान्हवीचे हे गाणे बघितल्यानंतर आता चित्रपट बघण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

(Actress Janhvi Kapoor staff member stopped fan while taking selfie)

पुढे वाचा :

International Women’s Day 2021 | अभिनयच नाही तर, उद्योग विश्वातही मराठी मनोरंजन विश्वातल्या ‘या’ अभिनेत्रींचा दबदबा!

Video | जगातील ‘मादक’ महिलांच्या यादीत सामील ‘या’ अभिनेत्रीचा रस्त्यावर डान्स, पाहा व्हिडीओ  

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.