AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नावाची घोषणा होताच पुरस्कार घेण्यासाठी धावली अभिनेत्री, त्यानंतर हजारो लोकांसमोर घडली धक्कादायक घटना

मोठ्या पडद्यावर वेग-वेगळ्या भूमिका साकारत कलाकार चाहत्यांच्या मनात राज करतात, अशात कलाकारांनी त्यांच्या कामाची शाबासकी पुरस्कार सोहळ्यात मिळते, पण या अभिनेत्रीसोबत तर...

नावाची घोषणा होताच पुरस्कार घेण्यासाठी धावली अभिनेत्री, त्यानंतर हजारो लोकांसमोर घडली धक्कादायक घटना
| Updated on: Feb 28, 2023 | 10:50 AM
Share

Actress Jessica Chastain Fell Down On Stage : वर्षभर मेहनत करून कलाकारांना पुरस्कार सोहळ्याबद्दल असलेली उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. त्यामुळे अभिनेते, अभिनेत्री एकपेक्षा एक ग्लॅमरस ड्रेस घालून पुरस्कार सोहळ्यात प्रवेश करतात. अशावेळी प्रत्येकाची नजर अभिनेत्रींच्या ड्रेसकडे असते. पण कधी-कधी ग्लॅमरस ड्रेस घालणं अभिनेत्रींना महागात पडतं. आता देखील असचं काही झालं आहे. नुकताच लॉस एंजेलिसमध्ये पार पडलेल्या 29व्या स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड अवॉर्ड्समध्ये अभिनेत्री जेसिका चॅस्टेन (Jessica Chastain) हिच्यासोबत असंच काहीसं घडलं. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र जेसिका चॅस्टेन हिच्या व्हिडीओची चर्चा आहे. (SAG Awards 2022)

पुरस्कार सोहळ्यात जेसिका हिने लाल रंगाचा गाउन घातला होता. जो प्रचंड फ्रिल होता. ‘जॉर्ज एन्ड टॅमी’ मधील दमदार अभिनयासाठी जेसिकाला सर्वोत्कृष्ट महिला अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्यामुळे जेसिका प्रचंड आनंदी होती. स्वतःच्या नावाची घोषणा झाल्यानंतर जेसिका पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर जात असताना अभिनेत्रीचा गाऊन तिच्या पायात अडकला आणि ती खाली पडली.

या घटनेनंतर देखील जेसिका तितक्यात अत्मविश्वासाने उभी राहिली आणि पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर पोहोचली. पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या घटनेबद्दल खुद्द अभिनेत्री जेसिका हिने स्पष्टीकरण दिलं आहे. सध्या सर्वत्र जेसिका हिची चर्चा आहे. जेसिकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (jessica chastain oscar isaac)

अभिनेत्री जेसिका म्हणाली, ‘असं काही होईल याचा मला अंदाज नव्हता. मी पायऱ्यांवर गेली, माझा पाय ड्रेसमध्ये अडकला. नशीब हे कोणाला माहिती झालं नाही. पण तिथे उपस्थित असलेल्या काही चांगल्या लोकांनी माझी मदत केली. त्यांच्यामुळे मी पुन्हा उभी राहू शकली…’ असं वक्तव्य जेसिकाने केलं. (jessica chastain movies netflix)

अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील फेअरमॉन्ट सेंच्युरी प्लाझा येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. 29 व्या वार्षिक स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड अवॉर्ड्समध्ये वर्षातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सेलिब्रिटींचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला… पण पुरस्कार सोहळ्यात जेसिकासोबत घडलेल्या घटनेमुळे पुरस्कार सोहळा चर्चेत राहिला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.