AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ती’ गोष्ट बेडरूमपर्यंतच ठेवा; कंगना रनौतचे बिनधास्त बोल; का केलं असं विधान?

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. दरम्यान, अभिनेत्रीने आता नव्या ट्विट्समुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

'ती' गोष्ट बेडरूमपर्यंतच ठेवा; कंगना रनौतचे बिनधास्त बोल; का केलं असं विधान?
Image Credit source: instagram
| Updated on: Apr 28, 2023 | 2:04 PM
Share

नवी दिल्ली : बॉलीवूडची स्पष्टवक्ती अभिनेत्री कंगना रनौत (kangana ranaut ) प्रत्येक मुद्द्यावर आपले मत उघडपणे मांडते. तिला तिचे विचार सर्वांसोबत शेअर करायला आवडतात. तिच्या विधानांमुळे अभिनेत्री अनेकदा वादात सापडते पण वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करण्यापासून ती मागे हटत नाही. दरम्यान, सुप्रीम कोर्टात समलैंगिक विवाहाबाबत (same sex marriage) सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान तिने जेंडर आणि सेक्शुअल प्रेफरन्स (gender and sexual preference) यासंदर्भात भाष्य केले आहे.

कंगनाने तिच्या ट्विटमध्ये जेंडर आणि सेक्शुअल प्रेफरन्स बद्दल मत मांडले आहे. कंगनाच्या म्हणण्यानुसार, एखाद्या व्यक्तीला त्याचे जेंडर आणि लैंगिकतेच्या आधारावर न्याय दिला जाऊ नये. आणि जे लोकं असं करतात, ते आयुष्यात जास्त पुढे जात नाहीत. कंगनाने अशा लोकांचीही खिल्ली उडवली आहे जे आपले जेंडर हीच ओळख बनवून त्याच आधारे सगळीकडे फिरत असतात.

कंगनाने तिच्या ताज्या ट्विटमध्ये लैंगिक तटस्थतेबद्दल (Gender neutrality) लिहिले आहे. कंगनाने ट्विटद्वारे लोकांना हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे की, तुम्ही कोणीही असाल, मग तुम्ही पुरुष/स्त्री/इतर काहीही असाल, तुमचे जेंडर काय आहे, याने काही फरक पडत नाही. या जमान्यात आपण अभिनेत्री, महिला दिग्दर्शक असे शब्द वापरत नाही. त्यांना आपण अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणतो. तुम्ही या जगात काय करत आहात हीच तुमची ओळख आहे, तुम्ही बेडरूममध्ये काय करता याने तुमची ओळख होत नाही.

कंगनाच्या म्हणण्यानुसार, तुमची लैंगिक पसंती काहीही असली तरी ती तुमच्या बेडरूमपर्यंत राहिली पाहिजे. त्यांना तुमचे ओळखपत्र बनवून ते सर्वत्र दाखवू नका. तुमचे जेंडर ही तुमची ओळख नसल्याचा पुनरुच्चार या अभिनेत्रीने पुन्हा एकदा केला. ती स्वतः ग्रामीण भागातील एक स्त्री आहे, जीवनाने तिला कोणतीही सवलत दिली नाही, तिला अभिनेते, चित्रपट निर्माते, निर्माते आणि लेखकांच्या जगात आपले स्थान निर्माण करायचे होते. कंगनाने लागोपाठ तीन ट्विट केले आहेत. ज्यामध्ये कंगनाने स्वतःला फक्त महिला समजणाऱ्यांना अशी चूक करू नये असा इशारा दिला आहे. कंगनाचे तिन्ही ट्विट जेंडर, फिजीकल, सेक्शुअल प्रेफरन्स यावर आधारित आहेत.

दरम्यान सुप्रीम कोर्टातील समलैंगिक विवाहासंबंधी याचिकेचा खटला सीजेआय डी वाय चंद्रचूड, जस्टिस एस के कौल, एसआर भट, हिमा कोहली आणि पीआर नरसिंह यांच्या घटनापीठासमोर सुरू आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

सेम सेक्स मॅरेज अर्थात समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता दिली जावी, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टातील घटनात्मक खंडपीठासमोर दोन्ही बाजूंचे वकील युक्तिवाद करत आहेत. मंगळवारी या प्रकरणात सुनावणी झाली. तेव्हा सुप्रीम कोर्टात सरकारची बाजू मांडणाऱ्या सॉलिसिटर जनरल म्हणाले, हा सामाजिक विषय आहे. त्यामुळे संसदेतच याचा निर्णय झाला पाहिजे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.