AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asha Bhosale : प्रचंड नाजूक होती त्यांची परिस्थिती…, कसे होते आशा ताईंचे शेवटचे क्षण? आठवणीत भावूक मुमताज…

Asha Bhosale : कसे होते आशा ताईंचे शेवटचे क्षण? रुग्णालयात पोहोचलेल्या मुमताज यांना काय दिसलं... भावूक होत सांगितले 'ते' शेवटचे क्षण... आशा भोसले यांच्या निधनाने बसलाय सर्वांनाच मोठा धक्का...

Asha Bhosale : प्रचंड नाजूक होती त्यांची परिस्थिती...,  कसे होते आशा ताईंचे शेवटचे क्षण? आठवणीत भावूक मुमताज...
गायिका आशा भोसले
| Updated on: Apr 14, 2026 | 10:28 AM
Share

Asha Bhosale : बॉलिवूडच्या दिग्गज गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 11 एप्रिल रोजी आशा ताईंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 12 एप्रिल रोजी आशा ताईंचं निधन झालं. आता आशा ताईंच्या आठवणी फक्त आपल्यामध्ये राहिल्या आहे. दरम्यान, आशा भोसले यांच्या जवळच्या मैत्रिण आणि अभिनेत्री मुमताझ यांनी त्यांच्या शेवटच्या क्षणांबद्दल मोठा खुलासा केला आहे. आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच मुमताज त्यांच्या भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्या. पण डॉक्टरांनी भेटण्यास नकार दिला. कारण तेव्हा आशा ताईंची प्रकृती नाजूक होती…

मुमताज म्हणाल्या, ‘आशा ताईंना भेटण्यासाठी मी रुग्णालयात पोहोचले. पण डॉक्टरांनी भेटू दिलं नाही. म्हणून मी रुग्णालयातून निघाले आणि काही वेळाने त्यांच्या कुटुंबियांचा मला फोन आला की, आशा ताईंचं निधन झालं आहे.’, आशा ताईंच्या निधनानंतर बॉलिवूड आणि संगीत विश्वात कधीच न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

आशा भोसले यांच्या आठवणी सांगत मुमताज पुढे म्हणाल्या, ‘रुग्णालयात दाखल होण्याच्या एक दिवस आधी, मी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलेली. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती… मी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या शेजरी राहायचे आणि कायम त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जायचे…’, सांगायचं झालं तर, काही वर्षांपूर्वी आशा भोसले आणि मुमताज याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेला. ज्यामध्ये देघी आनंदाने एकत्र डान्स करताना दिसल्या.

आशा भोसले यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी तब्बल 7 दशकं संगीताची सेवा केला. या वर्षांमध्ये त्यांनी 20 भाषांमध्ये जवळपास 12 हजारपेक्षा अधिक गाण्यांना स्वतःचा आवज दिला. सर्वात जास्त रेकॉर्डिंग केल्याने त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड आहे… त्यांना सूरांची मल्लीका म्हटलं जात होतं. सूरच आशा ताईयांच्यासाठी सर्वकाही होतं. पण संपूर्ण देशाने तो सूर कायमचा गमावला आहे.

आशा भोसले यांचं सिनेविश्वात फार मोठं योगदान आहे. आशा ताईंनी जवळपास सर्वच कलाकारांसाठी गाणी गायली आहेत. ज्यामुळे सेलिब्रिटींना त्यांची ओळख भक्कम करण्यास अधिक मदत झाली. मुमताज, हेलन यांच्या करियरमध्ये तर आशा ताईंचा फार मोठा वाटा आहे. आशा ताई यांची कमतरता इंडस्ट्रीला कायमच भासत राहील…

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...