बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री संतापली, थेट निर्मात्यासोबत भांडण, म्हणाली 12 तासांपेक्षा..
अभिनेत्री राधिका आपटे हिने मोठा निर्णय घेतला असून तिने तिच्या शिफ्टबद्दल मोठी मागणी केली. शिवाय 12 तासांपेक्षा अधिक काम करणार नसल्याचेही भूमिका तिने घेतली. ज्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले आहे.

बॉलिवूड चित्रपट असो किंवा मालिका यांचे शूटिंग कित्येक तास सुरू असते. अशावेळी 15-16 तास काम करण्याची वेळ कलाकारांवर येते. शिवाय मेकअप करण्यासाठी लागणारा वेळ वेगळाच. यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने शूटिंगच्या शिफ्टविरोधात आवाज उठवला होता. हेच नाही तर मुलीला देण्याचा वेळ आणि आठवड्याला सुट्टीची मागणी केल्याने थेट एका बड्या चित्रपटातून दीपिका पादुकोण हिला घरचा रस्ता दाखवण्यात आला. शूटिंगच्या शिफ्ट टाईमिंगवर बोलणे दीपिका पादुकोण हिला चांगलेच महागात पडले. आता दीपिका पादुकोण हिने उचललेल्या मुद्द्यानंतर बॉलिवूडमधील कामाच्या आणि वैयक्तिक आयुष्यातील संतुलनाबद्दलची चर्चा पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. दीपिका पादुकोननंतर आता राधिका आपटे हिने चित्रपटसृष्टीतील कामाच्या लांबच्या तासांवर उघडपणे भाष्य केले. काही दिवसांपूर्वीच राधिका आपटे हिने बाळाला जन्म दिला.
राधिका आपटे हिने नुकताच एक मुलाखत दिली. मुलाखतीमध्ये बोलताना राधिका आपटे हिने म्हटले की, मी जास्त वेळ काम करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. ज्यामुळे माझ्यात आणि निर्मात्यांमध्ये वाद झाला. राधिकाने म्हटले, मला जर इंडस्ट्रीमध्ये काही बदल करण्याची संधी मिळाली तर मी सर्वात अगोदर कामाच्या वाढलेल्या तासांवर काम करेल. कारण कामाचे वाढलेले तास ही मोठी समस्या बनत चालले आहे.
आपल्या मुलांना दूर ठेऊन आठवडाभर त्या व्यक्तीने काम करावे, ही अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे किंवा कोणीही व्यक्ती तसे करू शकत नाही, हे माझे स्पष्ट मत आहे. मी जास्त तास शिफ्ट करण्यास स्पष्टपणे नकार दिला, ज्यानंतर मोठा वाद माझा सेटवर झाला. राधिका आपटे हिने म्हटले की, अनेक लोकांनी मला मुलासाठी आया ठेवण्याचा आणि मुलाला सेटवर आणण्याचा सल्ला दिला. पण मुळात म्हणजे हा काही उपाय नाहीये.
ज्या लोकांनी मला हा सल्ला दिला त्यांना मी स्पष्ट शब्दात सांगितले की, मला माफ करा… पण हे समस्येवर समाधानकारण उत्तर नक्कीच नाहीये. राधिका आपटे म्हणाली की, मी कोणत्याही परिस्थितीमध्ये बारा तासापेक्षा अधिक काम करूच शकणार नाहीये. यामध्ये प्रवास, मेकअप आणि शूटिंग यासर्वांचा समावेश असेल. मेकअप किंवा प्रवास सोडून बारा तास नाही. जर समजा मला प्रवासासाठी 2 तास लागत असतील तर त्यानुसार शूटिंगचे नियोजन करायला हवे.
