39 वर्षीय ‘बिग बॉस’ अभिनेत्री देतेय गंभीर आजाराशी झुंज; झटक्यात 9 किलो वजन कमी,घटस्फोटानंतर जगतेय एकटं आयुष्य
अभिनयापेक्षा वैयक्तीक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिलेली अभिनेत्री सध्या एका आजाराशी झुंज देत आहे. तिच्या सोशल मीडियावर तिने काही फोटो पोस्ट करून तिच्या आजाराबद्दल तसेच तिच्या मानसिक स्थितीबद्दल सांगितलं आहे. तसेच ही अभिनेत्री वयाच्या 39 वर्षीही एकटीच आयुष्य जगत असून तिने अनेक अडचणींचा सामना केला आहे.

एका हिंदी मालिकेतून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री नंतर बिग बॉसमधूनही तेवढीच प्रसिद्ध झाली. तसेच सुरुवातीलच व्हिलेनचे पात्र साकारून तिने स्वत:चा वेगळा चाहता वर्ग बनवला. ही अभिनेत्री तिच्या अभिनयामुळे जेवढी चर्चेत राहीली त्यापेक्षा जास्त ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. तिचे अफेअर आणि तिचा घटस्फोटाच्या बातम्यांनंतर तर ती जास्तच चर्चेत आली.
आरोग्याच्या समस्यांशी झुंजत आहे
सध्या ही अभिनेत्री एकटीच आयुष्य जगत असून ती एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. ही अभिनेत्री म्हणजे टेलिव्हिजन क्विन रश्मी देसाई. रश्मी देसाई तिच्या फिटनेस प्रवासाबद्दल नेहमीच मोकळेपणाने बोलली आहे. आरोग्याच्या समस्यांशी झुंजत असूनही त्यासाठी तिने फार मेहनतीने 9 किलो वजन कमी केले आहे. तसेच हा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता हे देखील तिने सांगितले. तिने पुढे म्हटले की या प्रवासाने तिला संयम, आत्मविश्वास आणि तिच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचे महत्त्व शिकवले आहे.
इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करत तिने म्हटलं…
रशमीने इंस्टाग्राम हँडलवर फोटो शेअर करताना लिहिले की, “हे पोस्ट करण्याचा माझा हेतू फक्त हे दाखवण्याचा होता की हा प्रवास सोपा नव्हता. मी माझ्या गंतव्यस्थानावर पोहोचलेली नाही, परंतु मला विश्वास आहे की मी ते करू शकते कारण माझा स्वतःवर विश्वास नव्हता. मी 9 किलो वजन कमी केले आहे आणि मला अनेक आरोग्य समस्या आहेत आणि मी हे कपडे घालते आणि एका वेळी एक पाऊल असं स्वतःला सांगत राहते.”
जीवनाचा अर्थ काय?
रश्मी देसाई पुढे म्हणाली, ‘प्रत्येकाला आराम आवडतो आणि आयुष्यात सर्वोत्तम काम करायचे असते, पण या सगळ्यात आधी आपण विसरतो की आपले नातेसंबंध आणि वचनबद्धता… मला, आपल्या स्वतःकडून खूप अपेक्षा आहेत आणि मला हे कळले आहे.’
View this post on Instagram
ही अभिनेत्री बॉडी शेमिंगची बळी ठरली आहे.
रश्मीने पोस्ट शेअर केली आणि लिहिले, “जग वाट पाहिल, चला योग्य ते करूया. मी माझा प्रवास सुरू केला आहे आणि तो अजूनही सुरू आहे, आणि मला माहित आहे की मी ठीक होईन.” यापूर्वी, आरती सिंगच्या संगीत समारंभातील फोटो व्हायरल झाल्यानंतर रश्मीला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. तिने एक मुलाखतीत सांगितले होते, “या इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी समर्पण लागते. मी नेहमीच 21-22 वर्षांची दिसू शकत नाही. माझा प्रवास सुंदर राहिला आहे, परंतु काही लोकांना बदल स्वीकारणे कठीण जाते.” असं म्हणत तिने स्वत:च्या मनातील खंत व्यक्त केली आहे.
कामाबद्दल बोलायचं झालं तर…
ही अभिनेत्री शेवटची 2025 मध्ये आलेल्या गुजराती चित्रपट “मॉम ताने नई समजा” मध्ये दिसली होती. 2023 मध्ये ती “रात्री के यात्री 2” या वेब सिरीजमध्येही दिसली होती. रश्मी देसाईने “उतरन” या टीव्ही मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि “नागिन 4” द्वारे प्रसिद्धी मिळवली. रश्मी देसाईचा नंदीश संधूशी घटस्फोट चार वर्षांच्या लग्नानंतर 2016 मध्ये झाला आणि तेव्हापासून ती अविवाहित आहे.
