AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिल्याच चित्रपटातून रातोरात बनली स्टार, पण अचानक झाली गायब.. आता चालवते बेकरी; या अभिनेत्रीला ओळखलं का ?

या अभिनेत्रीला आधी डॉक्टर बनायचं होतं. पण ग्लॅमरच्या दुनियेतील एका छोट्याशा अनुभवाने तिचं आयुष्य बदललं आणि करिअरचा मार्गही.. हिला ओळखलंत का ?

पहिल्याच चित्रपटातून रातोरात बनली स्टार, पण अचानक झाली गायब.. आता चालवते बेकरी; या अभिनेत्रीला ओळखलं का ?
या अभिनेत्रीला ओळखलं का ?
| Updated on: Jul 16, 2026 | 9:56 AM
Share

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य केले. रातोरात प्रसिद्धी, चाहत्यांची गर्दी आणि स्टारडम मिळाले… पण त्यानंतर मात्र त्यांच्या करिअरला अपेक्षित उंची गाठता आली नाही. अशा कलाकारांना वन फिल्म वंडर म्हटले जाते. या यादीत राहुल रॉय, भाग्यश्री, भूमिका चावला, ग्रेसी सिंह यांच्यासोबतच एक नाव आवर्जून घेतले जाते ते म्हणजे संदली सिन्हा. आज संदली सिन्हाची चर्चा होण्याचे कारण म्हणजे तिचा सुपरहिट चित्रपट तुम बिन. या चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली. 2001 साली आलेल्या या रोमँटिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई तर केलीच, पण संदलीच्या निरागस चेहऱ्याने आणि गोड हास्याने लाखो चाहत्यांना भुरळ घातली होती.

तुम बिनमध्ये संदलीने ‘पिया’ नावाच्या साध्या, निरागस मुलीची भूमिका साकारली होती. तिचा अभिनय, तिचा लूक आणि तिच्या चेहऱ्यावरचा गोडवा प्रेक्षकांना खूप आवडला. चित्रपट रिलीज होताच संदली रातोरात स्टार बनली. प्रत्येकाच्या तोंडी तिचंच नाव होतं. पण या जबरदस्त सुरुवातीनंतर तिचे फिल्मी करिअर मात्र अपेक्षेप्रमाणे पुढे जाऊ शकले नाही.

कोण आहे संदली सिन्हा?

संदलीचा जन्म एका अशा कुटुंबात झाला, जिथे देशसेवा आणि शिक्षणाला खूप महत्त्व होते. तिचे वडील भारतीय सैन्यात होते आणि देशासाठी सेवा बजावताना शहीद झाले. त्यानंतर तिच्या आईने दिल्लीत संदली आणि तिच्या दोन भावंडांचा सांभाळ केला. संदलीने दिल्लीतील एअर फोर्स बाल भारती स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि जीझस अँड मेरी कॉलेजमधून पदवी पूर्ण केली. सुरुवातीला तिला डॉक्टर बनायचे होते, कारण तिच्या कुटुंबात डॉक्टर आणि पायलट होते. पण एका फॅशन शोने तिच्या आयुष्याला वेगळे वळण दिले आणि ती ग्लॅमरच्या दुनियेकडे वळली.

सोनू निगमच्या आल्बममध्येही झळकली होती अभिनेत्री

कॉमर्समध्ये पदवी घेतल्यानंतर संदली करिअर करण्यासाठी मुंबईत आली. मॉडेलिंगपासून तिने सुरुवात केली आणि लवकरच तिची ओळख निर्माण झाली. सोनू निगमच्या दीवाना या लोकप्रिय म्युझिक व्हिडिओमधून तिला पहिली मोठी ओळख मिळाली. विशेष म्हणजे या व्हिडिओचे दिग्दर्शन करणारे अनुभव सिन्हा पुढे तिच्या पहिल्या चित्रपटाचे म्हणजेच तुम बिनचे दिग्दर्शक ठरले.

अनेक चित्रपटांत केलं काम

तुम बिनच्या यशानंतर संदलीकडे चित्रपटांच्या ऑफर्सचा पाऊस पडला. ती पिंजर, ओम आणि अब तुम्हारे हवाले वतन साथियो यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली. मात्र, पहिल्या चित्रपटासारखी जादू पुन्हा निर्माण होऊ शकली नाही. तिला मुख्य भूमिकांऐवजी सहाय्यक भूमिका मिळू लागल्या आणि हळूहळू ती चित्रपटांपासून दूर गेली.

ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर, संदली आता काय करते ?

2005 मध्ये संदली सिन्हाने उद्योगपती किरण सालस्कर यांच्याशी लग्न केले. या दोघांना दोन मुलं आहेत. 2016 साली रिलीज झालेल्या तुम बिन 2मध्ये संदली ती छोट्याशा विशेष भूमिकेत दिसली होती. आज संदली सिन्हा मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी तिची ओळख अजूनही तुम बिनमधील त्या गोड आणि निरागस ‘पिया’मुळेच कायम आहे. माहितीनुसार, आता ती बेकरी चालवते तसेच स्पा व्यवसाय सांभाळते. जरी तिचे बॉलिवूड करिअर फार काळ टिकले नाही, तरी एका चित्रपटातून मिळालेली लोकप्रियता आजही तिच्या चाहत्यांच्या मनात जिवंत आहे.

Follow Us
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा