AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shikha Malhotra : स्ट्रोकनंतर अभिनेत्री शिखा मल्होत्राची भावनिक पोस्ट, प्रकृतीत सुधारणा

शिखा मल्होत्रानं आता आईसोबतचा एक फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट केली आहे. (Actress Shikha Malhotra's emotional post after stroke)

Shikha Malhotra : स्ट्रोकनंतर अभिनेत्री शिखा मल्होत्राची भावनिक पोस्ट, प्रकृतीत सुधारणा
VN
VN | Updated on: Dec 22, 2020 | 12:05 PM
Share

मुंबई : शाहरुख खानसोबत फॅन या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री शिखा मल्होत्रा ​​कोरोना काळात लोकांच्या मदतीसाठी पुढे आली होती. शिखाला स्ट्रोक आणि पॅरालिसीस झाला आहे. आता तिची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे मात्र स्ट्रोक आणि पॅरालिसीस याचा परिणाम तिच्या शरीराच्या डाव्या बाजूवर झाला आहे. शिखानं आता एक पोस्ट शेअर करत आता आपण आधीसारखं चालू शकणार की नाही, अशी भीती व्यक्त केलीय.

शिखानं आता आईसोबतचा एक फोटो शेअर करत ‘ हळूहळू का होईना पण माझ्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे.मला शंका आहे की मी आधी सारखं चालू शकणार की नाही.’ असं कॅप्शन दिलं आहे. सोबतच तिनं एका मुलाखतीत सांगितलं की, स्ट्रोक आल्यानंतर आधी तिला मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र प्रकृतीत सुधारणा नसल्यानं तिला केईएम रुग्णालयात हलवण्यात आलं.

नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत शिखा म्हणाली होती की ‘माझं शरीर आता ठीक नाही, मात्र जेव्हा मी माझ्या ‘कांचली’ या चित्रपटाबद्दल विचार करते तेव्हा माझं हृदय आनंदानं फुलून येतं. या चित्रपटात मी मुख्य भूमिकेत झळकली आहे. शिखा पुढे म्हणाली- अनेकांना चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी माहिती नाही. मी आयुष्यातील एका कठीण टप्प्यातून जात आहे. मी माझ्या कामाबद्दल खूपच पॅशनेट आहे आणि मला तुम्हा सगळ्यांच्या आधाराची गरज आहे.

शिखानं कोरोना काळात नर्सच्या रुपात गरजू लोकांची सेवा केली होती. तिनं वर्धमान महावीर कॉलेज सफदरजंग हॉस्पिटलमधून नर्सिंगमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. कोरोना काळापूर्वी तिनं कधीही नर्स म्हणून काम केलं नाही. मात्र गरज असताना ती पुढे आली होती.

संबंधित बातम्या

New Web Series | सनी लियोनीचा एक्शन धमाका, लवकरच ‘या’ वेब सीरीजमध्ये दिसणार !

वाढदिवसाच्या पार्टीत गोविंदाचा पत्नीसोबत डान्स, पाहा व्हिडीओ

Video | सारा अली खानची शायरी ऐकून अक्षय कुमारच्या डोळ्यात आले पाणी! 

Follow Us
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी