तब्बल 13 वर्षानंतर झाली बाप-लेकीची भेट, पलक तिवारीला पाहून राजा चौधरी भावूक!

छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिची लेक पलक (Palak Tiwari) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आजकाल ती तिच्या ‘रोजी’ या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे.

तब्बल 13 वर्षानंतर झाली बाप-लेकीची भेट, पलक तिवारीला पाहून राजा चौधरी भावूक!
श्वेता तिवारी, राजा चौधरी आणि पलक तिवारी
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 9:43 AM

मुंबई : छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिची लेक पलक (Palak Tiwari) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आजकाल ती तिच्या ‘रोजी’ या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. पलक श्वेता आणि तिचा पहिला पती अभिनेता राजा चौधरी (Raja Chaudhary) यांची मुलगी आहे. राजाने बर्‍याच दिवसांनी आपल्या मुलीची भेट घेतली आहे. त्यानंतर त्याने लेक पलकसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत, भावनिक पोस्ट लिहिली आहे (Actress Shweta Tiwari Ex Husband Raja Chaudhary meet his daughter palak tiwari after 13 years).

राजा चौधरी यांनी पलकसोबतचा सेल्फी सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, ‘माझ्या आयुष्यातील एक खास क्षण. मी तिला 13 वर्षांनंतर भेटलो. जेव्हा मी तिला शेवटच्या वेळी पाहिले, तेव्हा ती एक लहान मुलगी होती आणि आता ती खूप मोठी झाली आहे.’

पाहा पोस्ट

मला आजही पलकची काळजी!

या संदर्भात एका वृत्तपत्राशी खास बातचीत करताना राजा चौधरी म्हणतात, ‘मी आणि पलक व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे एकमेकांशी जोडले गेले होतो. मी तिला रोज गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवत असे, पण आम्ही भेटलो नव्हतो. मी माझ्या आई-वडिलांसह मेरठमध्ये राहतो, पण सध्या काही कामानिमित्त मुंबईला आलो होतो. मी येथे येऊन पलकला फोन केला, तेव्हा ती तिच्या चित्रपटाची रिहर्सल करत होती. तरीही वेळ काढून आम्ही मुंबईच्या अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये भेटलो. जिथे आम्ही जवळपास दीड तास एकमेकांशी बोललो. मी भूतकाळाबद्दल काहीच बोललो नाही. आमच्यात भविष्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी झाल्या.’

राजा पुढे म्हणतात, ‘मी तिला आमच्या कुटूंबाबद्दल सांगितले. तिचे आजी-आजोबा काका आणि काकू कसे आहेत, हे सांगितले. त्यांच्याबद्दल जाणून घेतल्यामुळे तिला देखील खूप आनंद झाला आणि मला सांगितले की ती लवकरच या सर्वांना भेटण्यास येणार आहे. आमच्या दोघांच्याही आयुष्याचा हा नवा टप्पा आहे. मी अजूनही पूर्वीसारखाच केअरिंग वडील आहे.’(Actress Shweta Tiwari Ex Husband Raja Chaudhary meet his daughter palak tiwari after 13 years)

मी श्वेताचा आभारी आहे!

ते पुढे म्हणाले की, ‘आयुष्याने मला दुसरी संधी दिली आहे. माझ्या आणि माझ्या मुलीच्या दरम्यान मला सर्वकाही ठीक करायचे आहे. या सर्व वर्षांमध्ये माझे तिच्याबद्दलचे प्रेम कधीच कमी झाले नाही. इतकी वर्षे मला पलकला भेटण्याची परवानगी नव्हती. पण आता ती मोठी झाली आहे आणि स्वतःचे निर्णय घेऊ शकते. इतक्या वर्षात मी तिला भेटू शकलो नाही, याचे मला खूप वाईट वाटते. एक वडील आणि लेकीमधील धमाल नातं मला आठवतं. तिची शाळा, तिच्या आवडी आणि निवडी या गोष्टी मला जाणून घेता आल्या नाहीत. आता जेव्हा मी माझ्या मुलीला इतक्या दिवसानंतर भेटलो, तेव्हा मला समजले की ती आता मोठी झाली आहे आणि ती खूप गोड मुलगी आहे. यासाठी मी माझी एक्स वाईफ श्वेता तिवारी हिचे आभार मानू इच्छित आहे. मी आता खूप आनंदी आहे.’

राजा-श्वेता यांचा घटस्फोट

राजा चौधरी आणि श्वेता तिवारी यांच्या लग्नाला सात वर्ष झाली होती. त्यानंतर श्वेताने राजापासून घटस्फोट घेण्यासाठी तब्बल 6 वर्षे केस लढली होती. घटस्फोटानंतर श्वेताने टीव्ही अभिनेता अभिनव कोहलीशी लग्न केले. पण, आता अभिनवबरोबरही तिचे नाते संपुष्टात आले आहे.

(Actress Shweta Tiwari Ex Husband Raja Chaudhary meet his daughter palak tiwari after 13 years)

हेही वाचा :

Soni Razdan | रणबीरला कोरोना होताच आलियाच्या आईने केला उद्धव सरकारला प्रश्न! म्हणाल्या…

कित्येक दिग्दर्शकांनी शेजारी झोपायला लावलं, पाकिस्तानच्या अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, झगमगत्या दुनियेचं भयान वास्तव समोर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.