AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक्स नवऱ्याच्या आरोपांनंतर श्वेता तिवारीची पहिली पोस्ट, कॅप्शनची होतेय प्रचंड चर्चा

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने तिच्या एक्स नवऱ्याच्या आरोपांनंतर शेअर केली पहिली पोस्ट. कॅप्शनची सोशल मीडियावर होतेय प्रचंड चर्चा.

एक्स नवऱ्याच्या आरोपांनंतर श्वेता तिवारीची पहिली पोस्ट, कॅप्शनची होतेय प्रचंड चर्चा
| Updated on: Jul 31, 2026 | 4:00 PM
Share

अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिचा माजी पती राजा चौधरी यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राजा चौधरी यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. त्यांनी मुलगी पलक तिवारी त्यांना वडील मानत नसल्याचा आरोप केला. तसेच श्वेता तिवारीने केलेले कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप फेटाळून लावत, आपण कधीही तिच्यावर हात उचलला नसल्याचा दावा केला आहे.

राजा चौधरी यांनी आणखी एक गंभीर आरोप करत श्वेता तिवारीचे ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतील सहकलाकार सेजान खान यांच्यासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे म्हटले. मात्र, या दाव्यांबाबत श्वेता तिवारीने अद्याप कोणतीही थेट प्रतिक्रिया दिलेली नाही.

राजा चौधरीच्या आरोपानंतर श्वेताची पहिली पोस्ट चर्चेत

या वादाच्या पार्श्वभूमीवर श्वेता तिवारीने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली. ही पोस्ट तिच्या आगामी रिअॅलिटी शो ‘ट्रेटर्स 2’ संदर्भातील असून त्यांनी, ‘यावेळी खरी कसोटी म्हणजे कोणावर विश्वास ठेवायचा हे ओळखणे’ असे कॅप्शन दिले. त्यामुळे तिने अप्रत्यक्ष प्रतिक्रिया दिली का याबाबत चर्चा रंगली आहे.

दरम्यान, ‘ट्रेटर्स 2’मध्ये श्वेता तिवारीसोबत मुनव्वर फारुकी, रिया चक्रवर्ती, दलीप ताहिल, पारुल गुलाटी, इक्का, साहिल सलाथिया आणि रिदा थराना हे कलाकारही सहभागी होणार आहेत.

पलकपेक्षा 93 लाख रुपयांच्या फ्लॅटला प्राधान्य का?

याशिवाय, राजा चौधरी यांनी घटस्फोटाच्या वेळी 93 लाख रुपयांच्या फ्लॅटला मुलगी पलकपेक्षा प्राधान्य दिल्याच्या आरोपांवरही स्पष्टीकरण दिले. न्यायालयाने मुलीला भेटण्याची परवानगी दिली होती, पण ती कधीच मिळाली नाही. तसेच अनेक प्रकरणांत नाव अडकल्यामुळे राहण्यासाठी घर मिळणे कठीण झाले होते, म्हणूनच तडजोड स्वीकारल्याचा दावा त्यांनी केला.

विशेष म्हणजे, श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांचा 1998 मध्ये विवाह झाला होता. 2007 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यावेळी श्वेता तिवारीने कौटुंबिक हिंसाचार आणि राजा यांच्या मद्यपानाच्या व्यसनामुळे वेगळे झाल्याचे सांगितले होते. सध्या श्वेता तिवारी आपल्या आगामी ‘ट्रेटर्स 2’ या शोच्या तयारीत व्यस्त असून, राजा चौधरी यांच्या आरोपांवर तिने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Follow Us
विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! दीपकेंचा आरोप
Abhijeet Dipke | विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप
अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन!
Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा
तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश
अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद...
Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल; विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले...
रक्ताने माखलेल्या गणवेशाची कहाणी सांगताना कुटुंबीयांना अश्रू अनावर
NEET आंदोलनानंतर पोलिसांच्या कुटुंबीयांची पत्रकार परिषद; रक्ताने माखलेल्या गणवेशाची कहाणी सांगताना कुटुंबीयांना अश्रू अनावर
हिंगोलीत कयाधू नदीला पूर! पुढील 48 तास अतिमहत्त्वाचे; प्रशासनाचा इशारा
ब्रेकिंग: हिंगोलीत कयाधू नदीला पूर! पुढील 48 तास अतिमहत्त्वाचे; प्रशासनाचा इशारा
जळगावमध्ये पावसाचा कहर! हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडले
Jalgaon | जळगावमध्ये पावसाचा कहर! हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडले; नद्यांना पूर
राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना...
Maharashtra Rain Alert | राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
दगडावरून आधार शोधणाऱ्यांना नोबेल मिळालाच पाहिजे...
Sanjay Raut Press | दगडावरून आधार शोधणाऱ्यांना नोबेल मिळालाच पाहिजे; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर खोचक निशाणा