AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनाक्षी सिन्हा हिने अखेर लग्नाचे गुपित केले उघड, म्हणाली, मीच…

Sonakshi Sinha Marriage : सोनाक्षी सिन्हा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. विशेष म्हणजे झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केल्यापासून सोनाक्षी सिन्हा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

सोनाक्षी सिन्हा हिने अखेर लग्नाचे गुपित केले उघड, म्हणाली, मीच...
Sonakshi Sinha
| Updated on: Jul 23, 2024 | 1:27 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावरही सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षी सिन्हा दिसते. सोनाक्षीने गेल्याच महिन्यात झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे झहीर इक्बाल आणि सोनाक्षीने काही वर्ष डेट केल्यानंतर लग्न केले. झहीरसोबतच्या लग्नाला तिच्या घरच्यांचा विरोध होता, असे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. लग्नानंतर सोशल मीडियावर खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षी दिसत आहे. अनेक हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका आतापर्यंतच्या करिअरमध्ये सोनाक्षीने केल्या आहेत.

झहीर इक्बाल याच्यासोबतच्या लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा हिचे दोन्ही भाऊ लव आणि कुश यांनी सोनाक्षी हिच्यासोबत सर्व नाते तोडल्याचे सांगितले जाते. हेच नाहीतर लग्नामध्ये लव आणि कुश उपस्थित नव्हते. काही दिवसांपूर्वीच लव सिन्हा याने सोशल मीडियावर सोनाक्षीच्या सासऱ्यांच्या विरोधात एक पोस्ट शेअर केली होती. मात्र, थोड्यावेळातच त्याने ही पोस्ट डिलीट केली.

आता नुकताच एक मुलाखत सोनाक्षी सिन्हा हिने दिली. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना सोनाक्षी सिन्हा ही दिसली. सोनाक्षी सिन्हा ही म्हणाली की, मी झहीर इक्बाल याला प्रपोज केला होता. तो प्रपोज लग्नासाठी होता. पहिल्यांदाच आपल्या आणि झहीरच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना सोनाक्षी सिन्हा ही दिसली आहे.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी अत्यंत जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये अगोदर सिव्हिल मॅरेज केले आणि त्यानंतर त्यांनी मोठ्या जंगी पार्टीचे आयोजन केले. लग्नात सही करताना सोनाक्षी सिन्हा हिने वडील शत्रुघ्न सिन्हा यांचा हात पकडल्याचे काही फोटोंमध्ये स्पष्ट दिसत होते. सोनाक्षी सिन्हा हिची आई देखील तिथेच उपस्थित होती.

सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नात अनेक हिंदू रितीरिवाज पार पडले. ज्याचेही फोटो व्हायरल होताना दिसले. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाला बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार उपस्थित होते. आपल्याच लग्नात झहीर इक्बाल याच्यासोबत खास डान्स करतानाही सोनाक्षी सिन्हा दिसली. सोनाक्षी सिन्हा मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान