मोहन भागवतांचं वक्तव्य मूर्खपणाचं, सोनम कपूरची आगपाखड

'कोणता विवेकी माणूस असं बोलतो? प्रतिगामी मूर्खपणाचं वक्तव्य' अशा शब्दात सोनमने राग व्यक्त केला आहे

Sonam Kapoor on Mohan Bhagwat, मोहन भागवतांचं वक्तव्य मूर्खपणाचं, सोनम कपूरची आगपाखड

मुंबई : सुशिक्षित-संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक असल्याचं वक्तव्य करणाऱ्या सरसंघचालकांवर अभिनेत्री सोनम कपूरने आगपाखड केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून सोनमने मोहन भागवतांवर संताप (Sonam Kapoor on Mohan Bhagwat) व्यक्त केला.

‘कोणता विवेकी माणूस असं बोलतो? प्रतिगामी मूर्खपणाचं वक्तव्य’ अशा शब्दात सोनमने राग व्यक्त केला आहे. सोनमच्या ट्वीटला हजारच्या घरात रिट्वीट मिळाले आहेत. कोणी सोनमला पाठिंबा दर्शवला आहे, तर कोणी तिची खिल्लीही उडवली आहे.

Sonam Kapoor on Mohan Bhagwat, मोहन भागवतांचं वक्तव्य मूर्खपणाचं, सोनम कपूरची आगपाखड

मोहन भागवत काय म्हणाले होते?

‘घटस्फोटाची प्रकरणे आजकाल मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. किरकोळ कारणांवरुन जोडपी भांडतात. सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाची प्रकरणे अधिक आढळतात, कारण शिक्षण आणि संपन्नतेसोबत अहंकारही येतो. त्यामुळे कुटुंबं विभक्त होतात. समाजही विभाजित होतो, कारण समाज हेही एक कुटुंब आहे’, अशी भूमिका मोहन भागवत यांनी मांडल्याचं संघाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. सरसंघचालक मोहन भागवत रविवारी संघाच्या कार्यकर्त्यांना अहमदाबादमध्ये संबोधत होते.

Sonam Kapoor on Mohan Bhagwat

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *