AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urmila Matondkar : पूर्व पती मोहसीन अख्तरपेक्षा किती श्रीमंत आहे उर्मिला मातोंडकर ?

Urmila Matondkar Net Worth : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. त्यानंतर तिचा पूर्व पती मोहसीन अख्तर याने दुसरं लग्न केलं. 8 वर्षांच्या संसारानंतर उर्मिला -मोहसनी वेगळे झाले होते. त्या दोघांमध्ये कोण श्रीमंत आहे, उर्मिलाची संपत्ती किती, जाणून घेऊया.

Urmila Matondkar : पूर्व पती मोहसीन अख्तरपेक्षा किती श्रीमंत आहे उर्मिला मातोंडकर ?
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरची संपत्ती किती ?
| Updated on: Jun 15, 2026 | 12:06 PM
Share

Urmila Matondkar Net Worth : उर्मिला मातोंडकर ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेतीर. 90 चा काळ गाजवणाऱी ही अभिनेत्री फक्त दिसायलाच सुंदर नाही तर तिच्या अभिनयाचं नाणंही खणखणीत वाजत. रंगीला, भूत, कौन, एक हसीना थी, पिंजर असे एकाहून एक सरस चित्रपट देणाऱ्या उर्मिलाच्या प्रोफेशनल आयुष्याप्रमाणेच तिचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत असतं. चित्रपटसृष्टीत सध्या फार कार्यरत नसलेली उर्मिलाच्या वैयक्तिक आयुष्यात खूप मोठा वादळ येऊन गेलं. दोन वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला. मोहसीन अख्तर याच्याशी असलेला तिचा 8 वर्षांचा संसार क्षणात मोडला. आणि आता उर्मिलाच्या पूर्वी पतीने, मोहसीनने पुन्हा लग्न केल्याची बातमी समोर आली आहे.

उर्मिला मातोंडकरने काश्मिरी बिझनेसमन मोहसिन अख्तरशी लग्न केलं होतं. तो तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान. मात्र लग्नाच्या आठ वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले. 2016 साली त्यांचं लग्न झालं मात्र 2024 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं. पहिला संसार मोडल्यानंतर अवघ्या काही काळाततच बिझनेसमन असलेल्या मोहसीनने दुसरा विवाह केला. सोशल मीडियावरील अकाऊंटवरून मोहसीनने निधा भट्टसोबतच्या निकाहचे फोटो शेअर केले.

उर्मिलाचं नेटवर्थ किती ?

पूर्व पतीच्या दुसऱ्या लग्नामुळे उर्मिला पुन्हा चर्चेत आली असून त्या दोघांपैकी अधिक श्रीमंत कोण, उर्मिलाची संपत्ती किती, तिची लाइफस्टाइल याबद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. रिपोर्ट्सनुसार, उर्मिला मातोंडकरची एकूण संपत्ती 68 कोटी रुपये असून ती आलिशान जीवनशैली जगते.

मिळालेल्या माहितीनुसार, उर्मिलाकडे 1.48 लाख रुपये किमतीचे सोन्याची नाणी आहेत. याव्यतिरिक्त, तिच्याकडे कोट्यवधी रुपये किमतीचे दागिने आहेत. ती जाहिरातींच्या माध्यमातूनही उत्पन्न मिळवते. तिच्या मालकीचे मुंबईत एक आलिशान घर आहे, ज्याची किंमत 1.68 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. तसेच तिच्याकडे मर्सिडीज-बेन्झसह अनेक आलिशान गाड्यांचा संग्रह आहे.

उर्मिला मातोंडकर आणि तिचा पूर्व पती मोहसिन अख्तर मीर या दोघांची फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​याने आयोजित केलेल्या एका पार्टीत भेट झाली होती. त्यांच्या नात्याची सुरुवात घनिष्ठ मैत्रीतून झाली आणि कालांतराने त्याचे रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न केलं. मात्र, आठ वर्षांनंतर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात काही अडचणी निर्माण झाल्या आणि त्यांनी 2024 साली घटस्फोट घेतला. त्यांच्या विभक्त होण्यामागचं नेमकं कारण समोर आलेलं नाही.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा