AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidya Balan | विद्या बालनला ठगांचा झटका, बनावट अकाऊंट उघडून नको ते उद्योग…

आजच्या काळात बॉलिवूड स्टार्सना लोकांशी जोडून ठेवण्यासाठी सोशल मीडिया बराच फायदेशीर ठरत आहे. अनेक स्टार्स सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहून, चाहत्यांशी टचमध्ये असतात. विविध पोस्टही शेअर करतात. मात्र प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे असतात, तसचे तोटेदेखील असू शकतात. सोशल मीडिया काही वेळा स्टार्ससाठी अडचणीचाही ठरू शकतो.

Vidya Balan |  विद्या बालनला ठगांचा झटका, बनावट अकाऊंट उघडून नको ते उद्योग...
| Updated on: Feb 21, 2024 | 10:25 AM
Share

मुंबई | 21 फेब्रुवारी 2024 : आजच्या काळात बॉलिवूड स्टार्सना लोकांशी जोडून ठेवण्यासाठी सोशल मीडिया बराच फायदेशीर ठरत आहे. अनेक स्टार्स सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहून, चाहत्यांशी टचमध्ये असतात. विविध पोस्टही शेअर करतात. मात्र प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे असतात, तसचे तोटेदेखील असू शकतात. हाच सोशल मीडिया काही वेळा स्टार्ससाठी अडचणीचाही ठरू शकतो. अनेक वेळा बॉलिवूड स्टार्सच्या नावाने फेक आयडी बनवून त्यांचा गैरवापर केला जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामध्ये आता आणखी एका नामवंत अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिलाही ठगांनी चांगलाच दणका दिला आहे. त्याप्रकरणी विद्याने पोलिसातही धाव घेतली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

विद्या बालन हिने नुकतीच, खार पोलिस स्टेशनमध्ये एका अज्ञात व्यक्तीविरोधात FIR दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्या बालन हिच्या नावे सोशल मीडियावर बनावट अकाऊंट बनवण्यात आले होते. त्या बनावट अकाऊंटच्या आधारे ती अज्ञात व्यक्ती लोकांना नोकरीचे आश्वासन देत होती आणि त्यासाठी पैशांची मागणीदेखील करत होती. तसेच बनावट ईमेल आयडी बनवून काहीजणांना संपर्क करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर विद्या बालनपर्यंत ही बातमी पोहोचली आणि बनावट अकाऊंटबद्दलही तिला समजलं. त्यानंतर तिने त्या अज्ञात व्यक्तीविरोधात तातडीने ॲक्शन घेतली. तिने खार पोलिसांत जाऊन या फसवणुकीप्रकरणात एफआयआर दाखल केली आहे.

खरंतर, आयटी कायद्याच्या कलम 66 (सी) अंतर्गत खार पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याचा तपासही सुरू करण्यात आला आहे. या अज्ञात व्यक्तीबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, यानंतर विद्या बालन हिने , तिच्या चाहत्यांना अशा बनावट अकाऊंटपासून सावध राहण्यास सांगितले आहे. स्टार्सच्या नावे फसवणुकीचे हे काही पहिले प्रकरण नाही. याआधीही अनेक स्टार्सच्या नावाने फेक अकाउंट तयार करण्यात आले. तसेच लोकांकडून पैशांची मागणीही करण्यात आली होती.

मंजुलिकाच्या भूमिकेत पुन्हा दिसणार विद्या

विद्या बालन हिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती आता ‘भूल भुलैया 3’ मुळे पुन्हा चर्चेत आली आहे. या चित्रपटात ती पुन्हा एकदा मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र विद्या बालन हिच्या नावाचीच चर्चा सुरू आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून अभिनेता कार्तिक आर्यनही त्यामध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.