AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्रीच्या भावाला अटक, बॉलिवूडमध्ये येण्याआधीच अडचणीत

एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीच्या भावाला अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज प्रकरणात रकुल प्रीत सिंगच्या भावाचे नाव समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी तिची देखील ईडीने चौकसी केली होती.

ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्रीच्या भावाला अटक, बॉलिवूडमध्ये येण्याआधीच अडचणीत
| Updated on: Jul 15, 2024 | 6:50 PM
Share

ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्रीच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे अभिनेत्रीचा भाऊ अडचणीत आला आहे. ड्रग्ज प्रकरण रकुल प्रीतची पाठ सोडत नसल्याचे दिसतेय. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्जचा मुद्दा चर्चेत होता. अशा स्थितीत अभिनेत्रीलाही ईडीकडून समन्स मिळाला होता. त्यानंतर ती स्पष्टीकरण देण्यासाठी ईडीसमोर हजर झाली होती. ईडी कार्यालयातून बाहेर पडतानाचा तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. ज्यामुळे तिला लोकांनी प्रचंड ट्रोल केले होते. आता तिच्यानंतर तिचा भाऊ अमन प्रीत सिंग ड्रग्ज प्रकरणात अडचणीत आला आहे. अभिनेत्रीच्या भावाला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण कोकेन रॅकेटशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज तेलंगणा अँटी नार्कोटिक्स ब्युरो म्हणजेच TGANB ला माहिती मिळाल्यानंतर सायबराबाद पोलीस आणि नरसिंगी पोलिसांसह एका फ्लॅटवर छापा टाकला गेला आणि अभिनेत्रीचा भाऊ अडकला.

2.6 किलो कोकेन जप्त

समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अभिनेत्री रकुल प्रीतच्या भावासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज घेतलेल्या 13 जणांची यादी आली आहे. 13 जणांचे औषध अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आता पोलीस लवकरच रकुल प्रीतचा भाऊ अमन प्रीत याला न्यायालयात हजर करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेलंगणा अँटी नार्कोटिक्स विभागाने सुमारे 2.6 किलो कोकेन जप्त केले आहे. हे कोकेन हैदराबादला विकण्याच्या उद्देशाने आणले होते. आता या प्रकरणात गोवण्यात आलेल्यांविरोधात चौकशी सुरू आहे.

रकुलप्रमाणेच तिचा भाऊ देखील अभिनेता आहे. सध्या तो बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत आहे. पण या प्रकरणानंतर त्याचे करिअर धोक्यात येऊ शकते. या प्रकरणावर अभिनेत्री किंवा तिच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. रकुल प्रीत सिंग तिच्या भावाच्या वतीने या प्रकरणावर स्पष्टीकरण देईल याची सर्वजण वाट पाहत आहेत. आता या प्रकरणाचे पुढे काय होते ते पाहावे लागेल.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.