सहावारी साडी नेसून अदा शर्मा समुद्रकिनारी, कार्टव्हील उडी पाहून चाहते हैराण!

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) नेहमीच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत राहते. अदा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे.

सहावारी साडी नेसून अदा शर्मा समुद्रकिनारी, कार्टव्हील उडी पाहून चाहते हैराण!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) नेहमीच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत राहते. अदा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती बऱ्याचवेळा आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच अदाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने गुलाबी रंगाची सहावारी साडी घातलेली आहे आणि साडीवर ती कार्टव्हील उडी मारताना दिसत आहे. अदाने महाराष्ट्रीय पध्दतीमध्ये साडी घातली आहे.( Adah Sharma’s video goes viral on social media)

हा व्हिडिओ समुद्रकिनाऱ्यावर शुट करण्यात आला आहे आणि यामध्ये अदाचा एक वेगळा लूक दिसत आहे. अदाचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. तिने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केल्यापासून चाहत्यांनी त्यावर कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. यापूर्वी जिम्नॅस्टिक्स अरोड़ाने अशाचप्रकारे साडी घालून एक व्हिडिओ तयार केला होता ज्यामध्ये ती सुध्दा साडी घालून कार्टव्हील मारत होती. तो व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. अदा सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अदा कमांडो 3 मध्ये शेवटी दिसली होती.

View this post on Instagram

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

देशातल्या एका सरकारने राज्यातील सिनेसृष्टीला मदत करण्यासाठी मोठे निर्णय घेतले आहेत. कोरोनाच्या जीवघेण्या काळात सिनेसृष्टीला मोठा आर्थिक फटका बसला. यातून दिलासा देण्यासाठी केरळ सरकारने सिनेमातील करमणूक कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता जानेवारी ते मार्च 2021 पर्यंत सर्व प्रकारचे करमणूक कर माफ करण्यात आले आहेत. तसंच गतवर्षी मार्च ते यंदा मार्चपर्यंत वीज शुल्कामध्येही 50 टक्के कपात केली जाणार आहे. राज्यातील अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी आणि तरुणांना नव्या संधीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या : 

Good News! बजेट आधीच ‘या’ राज्य सरकारने रद्द केला करमणूक कर, सिनेसृष्टीत आनंद

‘नवे वर्ष, नवा हर्ष’, जान्हवी कपूरचं ‘गुड लक जेरी’चं शूटिंग सुरु, पाहा खास लूक…

( Adah Sharma’s video goes viral on social media)

Published On - 9:30 am, Tue, 12 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI