आदेश बांदेकरांच्या मुलाचे मनोरंजन क्षेत्रात पदार्पण, मालिकेचे नावंही ठरलं

त्यामुळे हल्ली कलाकारांसोबतच स्टारकिड्सची देखील चर्चा मोठ्या प्रमाणात होत असते. (Adesh Bandekar Son Soham Bandekar 'Nave Lakshya')

आदेश बांदेकरांच्या मुलाचे मनोरंजन क्षेत्रात पदार्पण, मालिकेचे नावंही ठरलं
आदेश बांदेकर, सोहम बांदेकर
Namrata Patil

|

Feb 23, 2021 | 11:32 PM

मुंबई : बाप डॉक्टर तर पोरगं पण डॉक्टर,  तसेच बाप किंवा आई कलाकार क्षेत्रात असतील, तर मुलंसुद्धा पावलावर पाऊल टाकण्याच्या तयारीत असतात. त्यामुळे हल्ली कलाकारांसोबतच स्टारकिड्सची देखील चर्चा मोठ्या प्रमाणात होत असते. या स्टारकिड्सच्या यादीत आता अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या मुलाचं नावदेखील जोडलं जाणार आहे. आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत सोहम बांदेकर आता मराठी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करत आहे. (Adesh Bandekar Son Soham Bandekar Debut With Marathi Serial ‘Nave Lakshya’)

सोहम बांदेकर हा ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून छोट्या पड्यावर झळकणार आहे. ही मालिका आदेश बांदेकर यांनी निर्मित केलेली आहे. नवे लक्ष्य या मालिकेतील महत्त्वाच्या भूमिकेतून सोहम पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर “नवे लक्ष्य” ही मालिका 7 मार्चपासून सुरू होत आहे. सोहम हा आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा आहे. सोहम प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याचा वेध नवे लक्ष्य मालिकेतून घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपले प्राण पणाला लावून सेवा देणाऱ्या पोलिसांची शौर्य गाथा या मालिकेत पाहायला मिळेल.

सोहम बांदेकरची “नवे लक्ष्य” ही पहिलीच मालिका आहे. त्यामुळे या मालिकेतून तो छोट्या पडद्यावर दाखल होत आहे. आतापर्यंत अनेक स्टारकिड्सने मालिका आणि चित्रपटातून मराठी मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. त्यात आता सोहम बांदेकरचीही भर पडली आहे.

आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर या दोघांनीही दीर्घकाळ छोट्या पडद्यावरील विविध मालिकांतून आपलं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये सोहमच्या पदार्पणाची उत्सुकता आहे.

(Adesh Bandekar Son Soham Bandekar Debut With Marathi Serial ‘Nave Lakshya’)

संबंधित बातम्या :

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस 14’च्या घरातलं आणखी एक ‘लव्ह कपल’ लवकरच लग्नबंधनात अडकणार!

कपिल शर्माच्या शोसारखाच ‘सरगम की साढे साती’ देणार लॉफ्टरचा डोस; सोनीवर नवीन मालिका

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें