Aditya Narayan | गायक आदित्य नारायण बोहल्यावर चढणार, ‘या’ अभिनेत्रीशी लग्नगाठ बांधणार!

Aditya Narayan | गायक आदित्य नारायण बोहल्यावर चढणार, ‘या’ अभिनेत्रीशी लग्नगाठ बांधणार!

नुकत्याच एका मुलाखती दरम्यान आदित्यने आपल्या प्रेमाची कबुली देत, लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले होते. या वर्षाच्या अखेरीस, नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान त्यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे.

Harshada Bhirvandekar

|

Oct 12, 2020 | 5:12 PM

मुंबई : नुकतीच गायिका नेहा कक्करने तिच्या लग्नाची घोषणा केली. पंजाबी गायक रोहनप्रीत सिंगला डेट करत असून, लवकरच त्याच्याशी लग्न करणार असल्याचे तिने जाहीर केले होते. आता नेहाचा खास मित्र, गायक, अभिनेता आणि टीव्ही शोचा होस्ट आदित्य नारायणने (Aditya Narayan) देखील लग्न करत असल्याचे जाहीर केले आहे. नेहाच्या लग्नाच्या घोषणेनंतर आदित्यनेदेखील लग्न करत असल्याचे जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Aditya Narayan All set to marry with Shweta Agarwal)

आदित्य नारायण त्याची सह-अभिनेत्री श्वेता अग्रवालशी (Shweta Agarwal) विवाह बंधनात अडकणार आहे. श्वेताने आदित्यसोबत ‘शापित’ या चित्रपटात काम केले होते. 10 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या सेटवरच आदित्य आणि श्वेताची ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि आता 10 वर्षांनी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे.

नुकत्याच एका मुलाखती दरम्यान आदित्यने आपल्या प्रेमाची कबुली देत, लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले होते. या वर्षाच्या अखेरीस, नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान त्यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे.

याबद्दल बोलताना आदित्य म्हणाला, ‘शापितच्या सेटवर माझी आणि श्वेताची भेट झाली होती. पहिल्याच भेटीत आमची छान मैत्री झाली होती. मात्र, काही काळाने आपण तिच्यावर प्रेम करू लागलो आहोत, याची जाणीव मला झाली. मी तिला याबद्दल कल्पनादेखील दिली होती. मात्र, त्यावेळी आम्ही दोघेही करिअरमध्ये सेटल होण्याचा प्रयत्न करत असल्याने, प्रेमाऐवजी मैत्रीच्या नात्याला अधिक प्राधान्य दिले.’ (Aditya Narayan All set to marry with Shweta Agarwal)

View this post on Instagram

आरंभ! #IIndianIdol @sonytvofficial @thecontentteamofficial @fremantleindia

A post shared by Aditya Narayan (@adityanarayanofficial) on

आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले

तब्बल 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेण्याविषयी बोलताना आदित्य (Aditya Narayan) म्हणाला, ‘प्रत्येक नात्याप्रमाणे आमच्या न्यात्यानेही गेल्या 10 वर्षांत अनेक चढ-उतार पाहिले आहेत. या सगळ्यात आम्ही एकमेकांना अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केले आहे. लग्न ही केवळ फॉर्मेलिटी आहे. या वर्षाअखेरीस आम्ही लग्न करणार आहोत. आई-वडिलांनाही श्वेताबद्द्ल माहिती आहे. त्या दोघांनाही ती खूप आवडते. इतक्या छान जोडीदारामुळे मी देखील खूप खुश आहे.’

एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ दिला

‘प्रत्येक नात्यात काहीना काही अडचणी असतात. याचा अर्थ असा नाही की, ते नाते नाते संपवले पाहिजे. आजकाल अशी लग्न फार कमी कालावधीत तुटतात. त्यामुळे आम्ही एकमेकांना जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ घेतला. 10 वर्ष एकमेकांसोबत घालवल्यावर, आता या नात्याला पुढे नेण्याचे आम्ही ठरवले आहे,’ असे म्हणत आदित्यने त्याच्या नातेसंबधातील भावनिक बंध उलगडला.

काही महिन्यांपूर्वी आमच्यात भांडण झाल्याने, आम्ही वेगळे झालो, अशा अफवा पसरल्या होत्या. तेव्हा श्वेतासोबत बाहेर जाणेदेखील मुश्कील झाले होते, असे आदित्य म्हणाला. काही महिन्यांपूर्वी आदित्यचे नाव नेहा कक्करशी देखील जोडले गेले होते. मात्र, त्यांचे नाते केवळ शोमधील गमतीचा भाग होते. परंतु, या दोघांमध्ये छान मैत्रीचे नाते आहे.

संबंधित बातम्या : 

नेहा कक्कर बोहोल्यावर चढणार, या गायकासोबत बांधणार सात जन्माची गाठ

(Aditya Narayan All set to marry with Shweta Agarwal)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें