AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला दिग्दर्शिका, ज्यांनी तालिबान्यांनाही शह दिला! वाचा सबा सहर यांच्याबद्दल

अफगाणिस्तानातील महिलांनी केवळ अभिनयातच नव्हे, तर दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या भूमिकेतही आपली क्षमता सिद्ध केली. आज आम्ही तुम्हाला अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला चित्रपट दिग्दर्शिका आणि निर्माती सबा सहारबद्दल (Saba Sahar) सांगणार आहोत,  ज्यांनी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी तालिबानशी लढा दिला होता.

अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला दिग्दर्शिका, ज्यांनी तालिबान्यांनाही शह दिला! वाचा सबा सहर यांच्याबद्दल
सबा सहर
| Edited By: | Updated on: Aug 19, 2021 | 7:35 AM
Share

मुंबई : तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे आणि या देशातील प्रत्येक व्यक्ती घाबरली आहे. लोक आपला जीव वाचवण्यासाठी अक्षरशः विमानाला लटकून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानचे राष्ट्राअध्यक्ष अशरफ घनी यांनी आधीच देश सोडला आहे आणि आता तेथील लोकांना देखील असहाय वाटू लागले आहे. सर्वत्र लोक अफगाणिस्तानच्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहेत आणि त्याबद्दल जोरदार चर्चा देखील सुरु आहे.

तिथल्या महिलांचे काय होईल आणि आपल्या कट्टरवादामुळे ओळखले जाणारे तालिबानी तिथल्या चित्रपट उद्योगाचे काय करतील, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.

जेव्हा तालिबानने सबा सहरवर हल्ला केला!

अफगाणिस्तानातील महिलांनी केवळ अभिनयातच नव्हे, तर दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या भूमिकेतही आपली क्षमता सिद्ध केली. आज आम्ही तुम्हाला अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला चित्रपट दिग्दर्शिका आणि निर्माती सबा सहारबद्दल (Saba Sahar) सांगणार आहोत,  ज्यांनी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी तालिबानशी लढा दिला होता.

वडिलांनी ओळखले कलागुण

सबा सहर यांचा जन्म 28 ऑगस्ट 1975 रोजी काबुलमध्ये झाला. त्या एक अफगाणी अभिनेत्री आणि तिथल्या पहिल्या चित्रपट दिग्दर्शिका आणि निर्माता होत्या. सबा यांना लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये काम करण्याची आवड होती, त्यांनी नेहमीच अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले. सबा अवघ्या आठ वर्षांची होत्या, जेव्हा त्यांनी त्यांचे पहिले सादरीकरण केले. आधी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या निर्णयाला विरोध केला होता. मात्र, जेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांचे सादरीकरण पाहिले, तेव्हा त्यांना त्यांच्या अभिनयाची खात्री पटली.

आजघडीला अफगाणिस्तानमधील वातावरण 24-25 वर्षांपूर्वी होते तसेच आहे. जेव्हा 1996मध्ये सबा पहिली पटकथा लिहित होत्या, तेव्हा तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आणि अफगाण सिनेमाला नैतिकतेच्या मार्गातून लोकांना भटकवण्याचे वर्णन केले. त्या वर्षी अफगाणिस्तानमध्ये असणाऱ्या फिल्म कंपनीची अनेक कार्यालये उद्ध्वस्त झाली.

पाकिस्तानमध्ये कूच

अशा हिंसक वातावरणात सबाला देश सोडून पाकिस्तानात जावे लागले. पाकिस्तानात राहत असताना, सबाने अमेरिकेत आश्रय घेतला आणि 2001मध्ये व्हिसा मिळाला. तालिबानची हुकूमशाही कोसळली, तेव्हा सबा आपल्या मायदेशी परतल्या आणि स्वतःची निर्मिती कंपनी स्थापन केली. या प्रवासात इतर काही दिग्दर्शकांनी त्यांना साथ दिली आणि अफगाण चित्रपट उद्योगाचा पुनर्जन्म झाला.

2004 मध्ये, सबाचा पहिला चित्रपट ‘द लॉ’ काबुलमध्ये प्रीमियर झाला. थिएटरच्या मालकाला भीती होती की, कदाचित दंगल होईल, पण जेव्हा हा चित्रपट दाखवला गेला, तेव्हा लोकांना तो खूप आवडला आणि चित्रपट हिट ठरला. सबा म्हणाल्या होत्या की, ‘मला हे दाखवायचे आहे की युद्ध, औषधे आणि दहशतवादापेक्षा अफगाणिस्तानमध्ये बरेच काही आहे’.  चित्रपटांमुळे त्यांना तालिबान कमांडरने जीवे मारण्याची धमकी दिली होती, असे देखील सबा म्हणाल्या होत्या. त्यांना सांगण्यात आले होते की, हे चित्रपट शरियतच्या विरोधात आहेत आणि जर ते थांबवले नाहीत, तर त्यांना शरियतानुसार शिक्षा होईल.

तालिबानचा कहर

त्यावेळी जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला, तेव्हा घरांना काळे रंग लावले गेले, जेणेकरून बाहेरच्या लोकांना स्त्रिया दिसू नयेत. जेव्हा, तालिबानचा कहर संपला, तेव्हा सबा सहर घराबाहेर पडल्या आणि पूर्ण झाकलेल्या पण आधुनिक अवतारातील कपड्यांमध्ये दिसली. सबा जे काही चित्रपट बनवतात, त्यांच्या कथा पोलिसांवर आधारित असतात. सबा 14 वर्षांच्या असताना त्यांनी देशाच्या अंतर्गत मंत्रालयाकडून प्रशिक्षण घेतले.

सब यांच्या जीवाला धोका!

सबा यांना दोन मुलगे आणि दोन मुली आहेत. आता देखील त्यांच्या जीवाला धोका आहे. त्याला जीवे मारण्याची धमकी अनेक वेळा देण्यात आली होती. जेव्हा आंतरिक मंत्रालयाला याची माहिती मिळाली तेव्हा काही फोन क्रमांक शोधले गेले जे कंधारमध्ये सापडले. मात्र, धमकीच्या कॉलची मालिका इथेच थांबली नाही आणि त्यांना आणखी धमक्या येऊ लागल्या. या धमक्यांमध्ये सांगितले जायचे की, आम्ही तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर मारू. यानंतर सबा स्वतःजवळ बंदूक आणि सशस्त्र अंगरक्षक ठेवू लागल्या.

सबाचा आवाज दाबण्यासाठी, 2020 मध्ये तालिबान्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. जेव्हा त्या त्यांच्या मुलीसोबत कारमध्ये होत्या, तेव्हा त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. यावेळी त्यांच्या पोटात चार गोळ्या लागल्या होत्या, पण सबा घाबरल्या नाहीत आणि तेथून पळून गेल्या. सबा म्हणतात की, ‘जर मला माझ्या हक्कांसाठी आणि स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी मरावे लागले, तर मी त्यासाठीही तयार आहे’.

हेही वाचा :

‘मला माझ्यासोबत नाना हवे आहेत!’, ‘आई कुठे काय करते’च्या ‘अनघा’चा ‘हा’ खास टॅटू पाहिलात का?

अश्लिल चित्रपटप्रकरणात राज कुंद्रांना एका खटल्यात दिलासा, मात्र तूर्तास सुटका नाहीच!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.