AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Afghanistan crisis : आता अफगाणिस्तानात पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या सक्रिय, बंदुकीचा धाक दाखवून लुटालूट

पाकिस्तानने तालिबानला (Afghanistan Taliban News) आधीपासूनच मदत केल्याचे पुरावे समोर आले होते. आता तर पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या अफगाणिस्तानात तैनात झाल्या आहेत. तालिबानने सत्तेचा दावा केल्यानंतर पाकिस्तानचे दहशतवादी आता तिथल्या सामान्य नागरिकांना त्रास देण्यास सुरुवात करत आहेत.

Afghanistan crisis : आता अफगाणिस्तानात पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या सक्रिय, बंदुकीचा धाक दाखवून लुटालूट
talibanis-2
| Edited By: | Updated on: Aug 18, 2021 | 1:23 PM
Share

Pakistani Terror Groups in Afghanistan : अफगाणिस्तानात अफरातफरी माजली असताना, पाकिस्तानने या देशाला बुडवण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न केले. पाकिस्तानने तालिबानला (Afghanistan Taliban News) आधीपासूनच मदत केल्याचे पुरावे समोर आले होते. आता तर पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या अफगाणिस्तानात तैनात झाल्या आहेत. तालिबानने सत्तेचा दावा केल्यानंतर पाकिस्तानचे दहशतवादी आता तिथल्या सामान्य नागरिकांना त्रास देण्यास सुरुवात करत आहेत. ताज्या माहितीनुसार, पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या अफगाणिस्तानात घुसून, काही भागात सामान्य जनतेची लुटालूट करत आहे.

इतकंच नाही तर जैश-ए-मोहम्मद (Jaish e Muhammad) आणि लष्कर ए तैयबाने (Lashkar e Tayyiba) काबूलसह अनेक ठिकाणी आपआपले चेक पोस्ट उभे केले आहेत. जिहादच्या नावे जबरदस्तीने पैसे वसूल केले जात आहेत. याशिवाय बंदुकीचा धाक दाखवून धमकावलं जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सच्या मते, तालिबानने राष्ट्रपती भवनचा ताबा घेतल्यानंतर काही तासातच पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या अफगाणिस्तानात सक्रिय झाल्या.

सिराजुद्दीन हक्कानीवर पाकिस्तानचं प्रेम

अफगाण सरकारमध्ये सिराजुद्दीन हक्कानीचा (Sirajuddin Haqani) समावेश व्हावा अशी पाकिस्तानची इच्छा आहे. सिराजुद्दीन हक्कानी हा तालिबानचा उपनेता आणि वॉन्टेड घोषित दहशतवादी आहे. त्याच्यावर काबूलमधील एका हॉटेलवर झालेल्या हल्ल्याप्रकरणात समावेश असल्याचा आरोप आहे. यामध्ये एका अमेरिकी नागरिकासह सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता. इतकंच नाही तर 2008 मध्ये माजी राष्ट्रपती हमीद करझई (Hamid Karzai) यांच्यावर हल्ला करण्याच्या कटातही त्याचा समावेश होता.

तालिबानचा क्रूर चेहरा 

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधून तालिबानच्या क्रुरतेचा एक व्हिडीओ समोर आलाय. काबुल विमानतळात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नागरिकावर तालिबान्यांनी थेट गोळीबार केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. अश्वका न्यूजने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. या व्हिडीओत एक नागरिक विमानतळाच्या भिंतीवर चढून विमानतळात जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी खालून काळ्या कपड्यातील एक बंदुकधारी या नागरिकाच्या दिशेने गोळी धाडतो. यानंतर हा नागरिकही भिंतीवरुन खाली पडतो.

तालिबानचा जन्म कसा झाला?

पश्तो भाषेत तालिबानचा अर्थ आहे विद्यार्थी…आता तुम्ही म्हणाल, इतका चांगला अर्थ मग कामं इतकी जिहादी का? तर कट्टर धार्मिक मदरशातून तालिबान उभा राहिलाय, त्यामुळे हे कसे लोक आहेत हे तुमच्या लक्षात येईल. सौदी अरेबियाने अफगाणिस्तानात असे मदरसे पोसले, ज्यात सुन्नी कट्टर इस्लामिक विचारधारेचा प्रचार केला जायचा. आधीच्या मुजाहिदीन जिहाद्यांमधीलच हा एक गट. पाकिस्तान आणि अफगाणिस्तामधील पश्तून भागात हा गट चांगलाच पोसला. ज्याला पाकिस्तानकडूनही चांगलीच मदत मिळाली

संबंधित बातम्या  

Video: तालिबानचा क्रूर चेहरा पुन्हा समोर, काबुल विमानतळात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकावर गोळीबार

अफगाणिस्तानात तालिबान्यांचं ‘राज’, पण या तालिबानचा जन्म कसा झाला? पाकिस्तानने कसं पोसलं?, वाचा सविस्तर…

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.