काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधून तालिबानच्या क्रुरतेचा एक व्हिडीओ समोर आलाय. काबुल विमानतळात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नागरिकावर तालिबान्यांनी थेट गोळीबार केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. अश्वका न्यूजने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. या व्हिडीओत एक नागरिक विमानतळाच्या भिंतीवर चढून विमानतळात जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी खालून काळ्या कपड्यातील एक बंदुकधारी या नागरिकाच्या दिशेने गोळी धाडतो. यानंतर हा नागरिकही भिंतीवरुन खाली पडतो.