3 लाख अफगाण सैन्य असतानाही, 60 हजार तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा कसा मिळवला? वाचा काय आहेत मुख्य कारणं

अफगाणच्या गनी सरकारकडे 3 लाखांहून जास्त सैनिक होते, तर तालिबानचे फक्त 60 हजारांचे सैन्य होते. असे असतानाही तालिबान्यांनी आपला आक्रमपणा दाखवला ही मोठी थरारक कामगिरी आहे.

3 लाख अफगाण सैन्य असतानाही, 60 हजार तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा कसा मिळवला? वाचा काय आहेत मुख्य कारणं
3 लाख अफगाण सैन्य असतानाही, 60 हजार तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा कसा मिळवला?
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 10:53 PM

काबूल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानींनी पुन्हा एकदा कब्जा केला आणि देशातील गनी सरकार उलथवून टाकले. त्यामुळे संपूर्ण देशभर प्रचंड अराजकता माजली आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल झाले आहेत. जनता स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालून धडपड करीत आहेत. तालिबान्यांच्या तावडीत सापडलेल्या अफगाणिस्तानचे आता काय होणार, असा प्रश्न उभा ठाकला आहे. याचदरम्यान तालिबान्यांच्या आक्रमणाचीही जगभर चर्चा होत आहे. इस्लामिक कट्टरपंथीय संघटना असलेल्या तालिबानने अवघ्या 72 तासांत अफगाणिस्तान काबीज केले. अर्थात शेवटच्या तीन दिवसांमध्ये तालिबान्यांच्या दहशतवाद्यांनी आपला इंगा दाखवत गनी सरकारला सळो कि पळो करून सोडले. अमेरिका आणि नाटोच्या सैन्याने अफगाणिस्तानमधून माघार घेतल्यानंतर देशाचा वाईट काळ सुरु झाला आणि तालिबान पुन्हा सक्रिय झाला. (How did the Taliban gain control of Afghanistan, Read what are the main reasons)

तालिबानसाठी लढणारे दहशतवादी आपल्या हातात बंदुका घेऊन एकेक शहर पादाक्रांत करत अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने वळले. त्यांनी काबूलच्या सर्व सीमा ताब्यात घेतल्या. दहशतवादी देशाच्या प्रत्येक गेटवर दबा धरून बसले. गनी सरकारशी बोलणी फिस्कटली, तर देशात घुसखोरी करून सर्व उध्वस्त करण्याचा तालिबानचा कट होता. किंबहुना काबूलमधील सर्व सरकारी इमारतींवर तालिबानने स्वतःचे नियंत्रण मिळवले होते. अफगाणच्या गनी सरकारकडे 3 लाखांहून जास्त सैनिक होते, तर तालिबानचे फक्त 60 हजारांचे सैन्य होते. असे असतानाही तालिबान्यांनी आपला आक्रमकपणा दाखवला ही मोठी थरारक कामगिरी आहे. विशेष म्हणजे तालिबानकडे लुटलेली आणि जुनी शस्त्र होती तर त्यांचा मुकाबला करण्यासाठी अफगाणच्या फौजांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र होती. या जोरावर अफगाणचे सैन्य तालिबानला पाणी पाजू शकले असते. मात्र तालिबान्यांच्या दहशतवाद्यांनी ते घडू दिले नाही. फक्त 72 तासांमध्ये तालिबानने अफगाणिस्तानच्या डझनभर शहरांवर ताबा मिळवत राजधानी काबूलवर धडक मारली होती आणि हे शक्य होण्यासाठी या गोष्टी कारणीभूत ठरल्या.

अफगाण सैन्यातील राष्ट्रीयत्वाचा अभाव

अमेरिकेने अफगाण सैन्याच्या उभारणीसाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करुनही अफगाणी लष्करी सैन्य मजबूत उभे राहू शकले नाही. शत्रू दिसताच सैनिक पळून जात असत. अमेरिकेने अफगाणी सैन्याच्या पगारासाठी दिलेल्या पैशात घोटाळे झाले. अनेक सैनिकांची केवळ कागदोपत्री नोंद दाखवून अधिकाऱ्यांनी पगाराचे पैसे लाटले. अफगाण सैन्यातील एकूण जवानांचा आकडा सरकारही कधीच सांगू शकले नाही.

तालिबानचा युद्धाचा अभ्यास पक्का

अफगाण सैन्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रं आणि विमानं असूनही तालिबानने त्यांच्या पायलट्सना हेरून ठार मारलं. युद्ध सोडून पळालेल्या अफगाण सैनिकांची अमेरिकन शस्त्रास्त्रं तालिबानसाठी समर्थकांना सहज मिळाली. तालिबानकडे देशाच्या भौगोलिक परिसराची इत्यंभूत माहिती होती. त्यामुळे शस्त्रं थोडी असली तरी तालिबानला अचूक माहितीमुळे आक्रमण करता आले.

अशरफ गनी सरकारच्या आर्थिक नाड्या आवळल्या

आधीच काबूलमधील सरकार तंगीत असतानाच अमेरिकेकडूनही येणारी मदतही कमी होत होती. त्यातच तालिबानने देशाच्या एक एक सीमा बंद करीत अशरफ गनी सरकारच्या आर्थिक नाड्या आवळल्या.

कमकुवत सरकार

अमेरिकेच्या पुढाकाराने सप्टेंबर 2018 मध्ये अफगाणिस्तानात सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या अशरफ गनी यांच्या सरकारला पुरेसा पाठिंबा नव्हता. तालिबानबरोबरच्या शांतता चर्चेतही अफगाण सरकारचं अस्तित्वच नव्हतं. गटा-गटात विखुरलेल्या अफगाणिस्तानातल्या जनतेला घनी एकत्र आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचं सरकार कमकुवत राहिलं. (How did the Taliban gain control of Afghanistan, Read what are the main reasons)

इतर बातम्या

अफगाणिस्तानच्या घडामोडींमध्ये नवं ट्विस्ट, आता मीच काळजीवाहू राष्ट्रपती, उपराष्ट्रपती सालेहकडून घोषणा

आरशात पाहून कुत्र्याचे वेडेवाकडे हावभाव, व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.