आरशात पाहून कुत्र्याचे वेडेवाकडे हावभाव, व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 17, 2021 | 8:15 PM

व्हिडिओमध्ये तुम्ही स्वत: पहाल, कुत्रा आरशासमोर कसा उभा आहे आणि वेडेवाकडे हावभा करीत आहे. हा व्हिडीओ बघायला खूप मजेशीर आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला जात आहे आणि या कुत्र्याचीही स्तुती करत आहेत.

आरशात पाहून कुत्र्याचे वेडेवाकडे हावभाव, व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
आरशात पाहून कुत्र्याचे वेडेवाकडे हावभाव, व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

नवी दिल्ली : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो नेहमी व्हायरल होत असतात. प्राण्यांशी संबंधित कंटेंट इंटरनेटवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या कंटेंटपैकी एक आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. प्राण्यांवर प्रेम करणारे लोक आपला फोन, लॅपटॉपची मेमरी त्यांच्याच फोटो आणि व्हिडीओने भरलेली असते. अशा गोंडस कुत्र्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. ज्यात कुत्रा स्वतःला आरशात पाहून वेडेवाकडे हावभाव करतो आणि त्याचा खूप आनंद घेतो. (Video goes viral on social media of a dog gesturing in the mirror)

काय आहे व्हिडिओमध्ये?

व्हिडिओमध्ये तुम्ही स्वत: पहाल, कुत्रा आरशासमोर कसा उभा आहे आणि वेडेवाकडे हावभाव करीत आहे. हा व्हिडीओ बघायला खूप मजेशीर आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला जात आहे आणि या कुत्र्याचीही स्तुती करत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कुत्रा स्वतःला आरशात पाहिल्यानंतर आधी तोंड हलवू लागतो आणि स्वतःचा चेहरा पाहून आश्चर्यचकित होतो आणि नंतर जोरजोरात भुंकू लागतो. आरशातही एक कुत्रा त्याच्यासारखाच भुंकताना पाहतो. आरशात आपलीच प्रतिमा आहे हे त्याला कळत नाही. तो तिथून निघून जातो आणि आपल्यासोबत आणखी एक कुत्रा घेऊन आरशासमोर येतो. आरशात दोन कुत्रे पाहून त्याला पुन्हा आश्चर्य वाटते आणि तो खूप जोरात भुंकू लागतो.

व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडिओ फक्त एकमेकांसोबत शेअरच करत नाहीत तर त्यावर मजेशीर कमेंट्स आणि प्रतिक्रिया देखील देत आहेत. हा व्हिडिओ एक डिजिटल क्रिएटर निरंजन महापात्रा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्याला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. (Video goes viral on social media of a dog gesturing in the mirror)

इतर बातम्या

एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता, मुलीनंतर आता पत्नी मंदाकिनी खडसेंनाही ईडीकडून समन्स

दादरमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग स्टेशन सुरु, पार्किंगचीही सुविधा, आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI