अफगाणिस्तानात तालिबान्यांचं ‘राज’, पण या तालिबानचा जन्म कसा झाला? पाकिस्तानने कसं पोसलं?, वाचा सविस्तर…

पश्तो भाषेत तालिबानचा अर्थ आहे विद्यार्थी...आता तुम्ही म्हणाल, इतका चांगला अर्थ मग कामं इतकी जिहादी का? तर कट्टर धार्मिक मदरशातून तालिबान उभा राहिलाय, त्यामुळे हे कसे लोक आहेत हे तुमच्या लक्षात येईल.

अफगाणिस्तानात तालिबान्यांचं 'राज', पण या तालिबानचा जन्म कसा झाला? पाकिस्तानने कसं पोसलं?, वाचा सविस्तर...
अफगाणिस्तान
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 6:56 AM

जेव्हा भारतात 75 वा स्वातंत्रदिन साजरा होत होता…तेव्हा अफगाणिस्तान पुन्हा एकदा क्रुर गुलामीत जात होता…तालिबानच्या त्या गुलामी, ज्यात जगणं हे नरकाहूनही अवघड आहे…तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर चढाई केली…राष्ट्रपती अश्रफ गनी देश सोडून पळाले…आणि तालिबानचे जिहादी थेट रायफल घेऊन राष्ट्रपती भवनात शिरले…पण, तालिबानकडे अफगाणिस्तानची सत्ता गेल्याने काय बदल होतील? तालिबानच्या हुकूमशाहीला अफगाणी नागरिक का घाबरतात? आणि तालिबानची यापुढची सत्ता कशी असेल? याबाबतची सगळी माहिती आपण आजच्या Know This च्या व्हिडीओतून घेणार आहोत..

तालिबानचा जन्म कसा झाला?

पश्तो भाषेत तालिबानचा अर्थ आहे विद्यार्थी…आता तुम्ही म्हणाल, इतका चांगला अर्थ मग कामं इतकी जिहादी का? तर कट्टर धार्मिक मदरशातून तालिबान उभा राहिलाय, त्यामुळे हे कसे लोक आहेत हे तुमच्या लक्षात येईल. सौदी अरेबियाने अफगाणिस्तानात असे मदरसे पोसले, ज्यात सुन्नी कट्टर इस्लामिक विचारधारेचा प्रचार केला जायचा. आधीच्या मुजाहिदीन जिहाद्यांमधीलच हा एक गट. पाकिस्तान आणि अफगाणिस्तामधील पश्तून भागात हा गट चांगलाच पोसला. ज्याला पाकिस्तानकडूनही चांगलीच मदत मिळाली

आधी अफगानी नागरिकांकडून तालिबानचं स्वागत

सोवियन सैन्यानं अफगाणिस्तानात मुजाहिदीनविरोधात अनेक वर्ष लढा दिला. पण शेवटी अफगाणिस्तानात खर्च होणारा अमाप पैसा, लपून लपून हल्ले करणारे मुजाहिदीन यांने सोवियत संघ वैतागला, आणि त्याने अफगाणिस्तानातून आपलं सैन्य परत बोलावलं. आता अमेरिकेचं सैन्य जसं परत चाललंय, तसंच त्यावेळी सोवियत रशियाचं सैन्य परतलं. रशियाचं सैन्य परतल्यानंतर मुजाहीदीन सत्तेसाठी आपापसात भिडू लागले. यांच्यातील संघर्षात सामान्य नागरिक मरु लागले. त्यातच तालिबान हा गट पुढे आला, भ्रष्टाचारावर अंकूश, अराजकतेच्या परिस्थितीत सुधारणा, रस्ते निर्मिती, व्यावसायिकरण यामुळे तालिबानी प्रसिद्ध झाले. लोकांनी त्यांचं स्वागतही केलं. आणि याच लोकप्रियतेचा फायदा घेत तालिबानी सत्तेत बसले.

तालिबानच्या अत्याचाराचे ते काळे दिवस

अफगाणिस्तानच्या सत्तेत आल्यानंतर त्याने खरं रुप दाखवायला सुरुवात केली. क्रूर इस्लामिक कायदे अफगाणिस्तानात लागू झाले. चोरीसाठी हात कापणं, हत्या किंवा व्यभिचारासाठी सार्वजनिक फाशी देणं, महिलांनी बुरखा घातला नाही तर त्यांना दगडांनी मारणं असे अत्याचार सुरु झाला. पुरुषांसाठी दाढी ठेवणं आणि महिलांनी बुरखा घालणं सक्तीचं होतं. 10 वर्षांहून अधिकच्या मुलींच्या शाळेत जाण्यावरही बंदी आली. महिलांना घराबाहेर पडताना, घरातील कुणी पुरुष सोबत असणं गरजेचा होता, नाहीतर त्यांना कोडे मारले जायचं. हेच काय तर तालिबानमध्ये टीव्ही पाहणं, संगीत ऐकणं आणि सिनेमा पाहण्यावरीही बंदी होती.

तालिबानला पोसणारा पाकिस्तान

पाकिस्तानने कधीही मान्य केलं नसलं तरी तालिबानला पोसण्यात पाकिस्तानचा मोठा हात आहे. सुरुवातीला जे तालिबानी तयार झाले, ते पाकिस्तानी मदरशातूनच आलेले होते. तालिबानच्या सत्तेला पाकिस्ताननेही स्वीकार केलं. हेच नाही तर तालिबान्यांना हत्यारं पुरवणं, प्रशिक्षणं देण्यातही पाकिस्तानचा हात असल्याचं उघड झालंय. पाकिस्तानच्याच हद्दीत तालिबान्यांचे ट्रेनिंग कॅम्प होते. याशिवाय सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातनेही अफगाणिस्तानातील तालिबानी शासन मान्य केलं. तालिबानला लागणारी आर्थिक मदत पाकिस्तानसह या 3 देशातून पुरवली जात होती.

अफगाणिस्तानात अमेरिकेची एन्ट्री

11 सप्टेंबर 2001…अमेरिकेच्या निर्वावाद सत्तेला सुरुंग लावणारी तारीख…अल कायदाने अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर विमानानी हल्ला केला…या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता ओसामा बिन लादेन…या हल्ल्यानंतर अमेरिका हादरला, आणि त्याने ओसामा बिन लादेनला मारण्याची मोहिम हाती घेतली…तालिबानने ओसामा बिन लादेनला लपवल्याचं अमेरिकेला कळालं…आणि सुडाने पेटलेल्या अमेरिकेने 7 ऑक्टोबर 2001 ला अफगाणिस्तानात शिरुन, तालिबानविरोधात युद्ध सुरु केलं..अवघ्या 3 महिन्यात अफगाणिस्तानातून अमेरिकेने तालिबानला सत्तेतून हटवलं…मात्र, तरही अमेरिकाला ओसामा सापडला नाही, कारण ओसामाने अफगाणिस्तानातून निघून पाकिस्तानच्या क्वेटा शहरात आसरा घेतला…पाकिस्तानला ओसामाची माहिती असूनही त्यांनी ती लपलल्याचं अनेक संरक्षण तज्त्र सांगतात. मात्र, अमेरिकेने छुप्या पद्धतीने अखेर ओसामाला शोधलं आणि त्याचा खात्मा केला.

आणि अमेरिका तालिबानला वैतागला

अमेरिकन सैन्याने तालिबान पळवून लावलं तरी, तालिबान छुप्या पद्धतीने हल्ले करतच होता. सप्टेंबर 2012 मध्ये तालिबानने काबूलमध्ये अनेक हल्ले केले, त्यातील एक हल्ला नाटोच्या कॅम्पवरही झाला. मात्र, त्यानंतर तालिबानने अधिकृतरित्या आपलं कार्यालय सुरु करण्याची घोषणा केली. 2013 मध्ये तालिबानने कतारमध्ये आपलं कार्यालय सुरु करण्याची घोषणा केली. मात्र, तरीही तालिबानकडून छु्प्या पद्धतीने अमेरिकन सैन्यावर हल्ले होतच राहिले. अमेरिकेचा अफगाणिस्तानातील खर्च हा कित्येक हजार डॉलरच्या घरात होता. त्यामुळे अमेरिकेला जास्तकाळ अफगाणिस्तानात राहणं शक्य नव्हतं. शेवटी 2020 ला अमेरिका आणि तालिबानमध्ये शांती करार झाला. कित्येक दिवस चालेलल्या या चर्चेत तालिबान अमेरिकेच्या अनेक अटीवर राजी झाला. त्यातच जो बायडन अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाले, आणि त्यांनी 11 सप्टेंबर 2021 पर्यंत सगळं अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून परत येईल ही घोषण केली. या घोषणेनंतर तालिबान्यांना आयतं कोलित हाती लागलं.

अफगाणिस्तान सरकार तालिबानपुढे हतबल

जसं अमेरिकन सैन्याने परतण्यास सुरुवात केली, तसा तालिबानाने पुन्हा अफगाणिस्तानवर ताबा मिळवणं सुरु केलं. एक एक करत तालिबान्यांनी अफगाणिस्तानचे प्रांत जिंकले, ज्यात त्यांनी हजारो सामान्य नागरिकांनाही मारलं. आणि अखेर 15 ऑगस्ट 2021 ला तालिबानने काबूलच्या गादीवर आपला हक्क सांगितला. राष्ट्रपती अश्रफ गनींसह बाकी सगळे मंत्री देश सोडून पळून गेलेत, सरकारी अधिकारी, सैन्य अधिकारी पळण्याचा प्रयत्न करताहेत, काबूल विमानतळावर एकच गर्दी झाली, पण आता सगळं संपलंय, अफगाणिस्तान पुन्हा एकदा तालिबान्यांच्या हातात आहे, ज्यांनी सध्या नागरिकांना सर्व अधिकार देण्याची भाषा केली, पण त्यांचं खरं रुप आधीच अफगाणिस्तानने आणि पर्यायाने जगाने अनुभवलंय…

(Afganistan taliban War Crisis Live Update)

हे ही वाचा :

अफगाणिस्तानच्या घडामोडींमध्ये नवं ट्विस्ट, आता मीच काळजीवाहू राष्ट्रपती, उपराष्ट्रपती सालेहकडून घोषणा

680 रुपये असलेला बदाम अचानक हजाराच्या वर कसा गेला? अफगाण युद्धाचे परिणाम थेट तुमच्या खिशावर?

पाश्चात्य देशांना लाज वाटली पाहिजे! अफगाणिस्तान प्रकरणावर संतापले जावेद अख्तर आणि शबाना आझमी

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.