AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत ब्रेकअप, आता ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करतेय ‘ती’

माजी मुख्यमंत्र्यांची सून होणार अशी अशी चर्चा सुरु असताना, त्यांच्या नातवासोबत अभिनेत्रीचं ब्रेकअप झालं... आता अभिनेत्री बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे.

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत ब्रेकअप, आता 'या' प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करतेय 'ती'
| Updated on: May 03, 2026 | 8:24 AM
Share

झगमगत्या विश्वात सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे किंवा इतर प्रोफेशनल कामांमुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत अली आहे. अभिनेत्री जिने आधी माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट केलं. पण ब्रेकअपनंतर तिच्या आयुष्यात आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे ती, अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री तारा सुतारिया आहे. वीर पहाडिया याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर तारा, अभिनेता आदित्य रॉय कपूर याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे…

सुरुवातीला आदित्य रॉय कपूर आणि तारा सुतारिया यांचं नाव त्यांच्या आगामी ॲक्शन सिनेमा ‘ओम’मुळे एकत्र जोडलं जात होतं, पण आता या कथेला रोमँटिक वळण लागलं आहे. फिल्मफेअरच्या वृत्तानुसार, ते दोघे आता अधिकृतपणे एकमेकांना डेट करत आहेत.

Filmfare च्या अधिकृत घोषणेनुसार, आदित्य आणि तारा B-town चे नवीन कपल आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. ज्यामुळे चाहत्यांना आधिच संशय आलेला… पहिल्यांदा दोघांनी ‘ओम’ सिनेमाच्या वर्कशॉप दरम्यान एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. आता दोघांमध्ये घट्ट नातं तयार झाल्याचं चित्र दिसत आहे… पण दोघांनी देखील नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

ताज्या रिपोर्टनुसार, हे कपल एकत्र खूप चांगला वेळ घालवत आहेत आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांच्यातील घट्ट नात्याचे संकेत दिले आहेत. तारा नुकतीच मुंबईतील तिच्या नवीन घरात राहायला गेल्यानंतर ही बातमी समोर आली आहे – हा एक महत्त्वाचा टप्पा तिने 2026 च्या सुरुवातीला साजरा केला.

तारा आणि वीर पहाडिया यांचं ब्रेकअप

वीर पहाडिया याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. म्हणून तारा सुतारिया आता माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची नातसून होणार… अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. AP ढिल्लो कॉन्सर्ट दरम्यान झालेल्या वादानंतर तारा आणि वीर याचं ब्रेकअप झालं… पण यावर दोघांनी देखील मौन बाळगलं आहे.

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा