धुरंधरनंतर,अक्षय खन्ना ‘या’ 6 चित्रपटांमध्ये दिसणार दमदार भूमिकेत; पुन्हा एकदा प्रेक्षकांना देणार सरप्राईज
'धुरंधर' आणि 'छावा' मधील खलनायकाच्या भूमिकेनंतर अक्षय खन्नाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंट स्थान निर्माण केलं आहे. 2025 हे वर्ष अक्षय खन्नाचं होतं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पण आता येणाऱ्या नवीन वर्षातही अक्षय खन्ना प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे. तो जवळपास 6 चित्रपटांमधून झळकणार आहे.

2025 मध्ये एक नाव सारखं चर्चेत राहिलं ते म्हणजे अक्षय खन्ना. हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर त्याचे सर्व चित्रपट हे हिट ठरले. तथापि, सर्वात जास्त चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे वर्षाची सुरुवात करणारा “छावा” आणि वर्षाचा शेवटचा चित्रपट ज्याने सर्वत्र धुरळा उडवून दिला तो म्हणजे “धुरंधर”. अक्षय खन्नाने या दोन्ही चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. पण या दोन्ही चित्रपटातून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. एवढंच नाही तर त्याचं जबरदस्त फॅन बनवलं.
धुरंधरमध्ये रहमान डकैतची भूमिका अक्षय खन्नाने उत्तम प्रकारे साकारली आहे. अलिकडेच चर्चेत असलेल्या या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. पण आता असे म्हटले जाते की अक्षय ‘धुरंधर 2’ मध्येही दिसणार आहे. ते त्याच्या व्यक्तिरेखेची झलक असेल की संपूर्ण व्यक्तिरेखा हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. पण 2025चं नाही तर नवीन वर्षात देखील अक्षय खन्ना प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. कारण जवळपास 5 चित्रपटांमध्ये तो वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहे. ते कोणते चित्रपट आहेत ते पाहुयात.
पुढील काळात या 5 चित्रपटात अक्षय खन्ना दिसणार
दृश्यम 3
पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या अजय देवगणच्या ‘दृश्यम 3‘ मध्ये अक्षय खन्ना एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. ‘दृश्यम 2’ मधील त्याच्या अभिनयाचेही चांगलेच कौतुक झाले. त्यामुळे ‘दृश्यम 3’ मध्ये त्याचा दमदार अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत. हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शीत होणार असल्याचं बोललं जातं.
इक्का
येत्या काळात अक्षय खन्ना ‘इक्का’ नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार नाही, तर थेट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. विशेष म्हणजे, या चित्रपटात तो अभिनेता सनी देओलसोबत दिसणार आहे. त्याने यापूर्वी सनी देओलसोबत ‘बॉर्डर’ चित्रपटात काम केले होते. हा त्यांचा एकत्र दुसरा चित्रपट असेल.
महाकाली
येत्या काळात अक्षय खन्ना आणखी एका चर्चेत असणाऱ्या तेलुगू चित्रपटात दिसणार आहे. अक्षय हा ‘महाकाली’ चित्रपटात शुक्राचार्य यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याच्या भूमिकेची एक झलकही समोर आली आहे. सध्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे.
कलम 84
‘सेक्शन 84’ नावाचा एक चित्रपट तयार होत आहे. अक्षय खन्ना या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी चर्चेत असल्याचे वृत्त आहे. ही एक अतिशय महत्त्वाची भूमिका असल्याचे म्हटले जाते. जर कास्टिंगची चर्चा यशस्वी झाली तर हा चित्रपट अक्षय खन्नाच्या चित्रपटसृष्टीत एक महत्त्वाची भर घालू शकतो.
बेनाम फिल्म
अक्षय खन्नाच्या चित्रपटांमध्ये एक चित्रपट देखील समाविष्ट आहे पण त्याबद्दल अद्याप तरी काही स्पष्ट झालेलं नाही. हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट असेल ज्यामध्ये अक्षय पुन्हा एकदा खलनायकाच्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतो. ही त्याची आतापर्यंतची सर्वात प्रभावी भूमिका असल्याचे म्हटले जाते.
