AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गदर 2’च्या यशानंतर सनी देओलने कतरिना कैफवर अप्रत्यक्षपणे साधला निशाणा, पहा व्हिडीओ

2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अपने' या चित्रपटात कतरिनाने बॉबी देओलसोबत भूमिका साकारली होती. त्यावेळी कतरिना इंडस्ट्रीत नवीनच होती. कदाचित त्यामुळे तिने आईची भूमिका साकारण्यासाठी नकार दिला असेल, असं म्हटलं जात आहे.

'गदर 2'च्या यशानंतर सनी देओलने कतरिना कैफवर अप्रत्यक्षपणे साधला निशाणा, पहा व्हिडीओ
Sunny Deol and Katrina KaifImage Credit source: Twitter
| Updated on: Aug 17, 2023 | 3:42 PM
Share

मुंबई | 17 ऑगस्ट 2023 : अभिनेता सनी देओल सध्या यशाच्या शिखरावर आहे. कारण त्याच्या ‘गदर 2’ या चित्रपटाने अवघ्या सहा दिवसांत कमाईचा 250 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. ‘गदर 2’ या चित्रपटामुळे बॉलिवूडला पुन्हा एकदा अच्छे दिन पहायला मिळत आहेत. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाला हा सीक्वेल आहे. या यशानंतर आता सनी देओल त्याच्या आगामी ‘अपने 2’ या चित्रपटासाठी तयारी करत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने ‘अपने’च्या सीक्वेलविषयी महत्त्वाची अपडेट दिली. त्याचसोबत त्याने अभिनेत्री कतरिना कैफवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला.

या मुलाखतीत सनी देओलला ‘अपने’च्या सीक्वेलविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “‘अपने’ या चित्रपटाची कथा माझ्याकडे तयार आहे. त्याच्या शूटिंगला कधी सुरुवात केली जाऊ शकते हे पहावं लागेल. माझ्याकडे जी कथा आहे ती खूपच चांगली आहे. पहिल्या भागात जी कौटुंबिक मूल्ये दाखवली होती, तीच सीक्वेलमध्येही पहायला मिळणार आहेत. त्याच कथेचा पुढचा भाग असेल.”

चित्रपटाविषयी अपडेट देत असतानाच सनी देओलने पुढे कतरिनाचं नाव न घेता तिला टोमणा मारला. “फक्त मला आता इतकंच वाटतं की, माझ्या ज्या एक-दोन अभिनेत्री होत्या, ज्या आईची भूमिका साकारण्यासाठी घाबरत होत्या. कदाचित आता त्या आईची भूमिका साकारतील,” असं तो पुढे म्हणाला. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अपने’ या चित्रपटात कतरिनाने बॉबी देओलसोबत भूमिका साकारली होती. त्यावेळी कतरिना इंडस्ट्रीत नवीनच होती. कदाचित त्यामुळे तिने आईची भूमिका साकारण्यासाठी नकार दिला असेल, असं म्हटलं जात आहे.

‘गदर 2’चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनीच ‘अपने’चं दिग्दर्शन केलं होतं. यामध्ये सनी देओल, बॉबी देओल आणि धर्मेंद्र यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्याचसोबत शिल्पा शेट्टीनेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. ‘गदर 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. स्वातंत्र्यदिनी या चित्रपटाने तब्बल 55 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर बुधवारी चित्रपटाच्या कमाईने 200 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. अवघ्या सहा दिवसांत ‘गदर 2’ने ही दमदार कामगिरी केली आहे. या वर्षातील हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.