
Saif Ali Khan Attack: अभिनेता सैफ अली याच्यावर मुंबईतील वांद्रे येथील राहत्या प्राणघातक हल्ला झाला. हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे. पण आजही अभिनेत्याचे चाहते चिंता व्यक्त करत असतात. सांगायचं झालं तर, सैफ अली खान याच्या घरात हल्लेखोराने लहान मुलहा जेह अली खान याच्या खोलीतून घुसला. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सैफ याने 16 जानेवारी रोजी घडलेली घटना सांगितली आणि संरक्षणासाठी अभिनेत्याला बंदूक का ठेवायची नाही? याचं कारण देखील सांगितलं.
यावर सैफ अली खान म्हणाला, ‘माझ्याकडे एकेकाळी बंदूक होती. पण आता नाही हे माझं भाग्य आहे. मला आता त्यावर विश्वास राहिेलेला नाही. घरात लहान मुलं आहे. कोणाच्या हातात बंदूल लागली आणि काही समस्या निर्माण झाली तर… म्हणजे पतौडीमध्ये सगळीकडे बंदुका आहेत. राजवाडा आणि राजस्थानी बंदुका असलेले सर्व लोक मला मेसेज पाठवत आहेत की त्यांचा विश्वास बसत नाही की तो माणूस सुटला कसा?’
‘माझे वडील कायम बंदूक घेऊन झोपायचे. पण कधी कधी, माझ्या मते अपघात घडतात कारण बंदूक त्याठिकाणी असते. माझ्या घरात एकही शस्त्र नाही. अशा काही तलवारी आहेत ज्या केवळ सजावटीच्या आहेत. काही लोकं आता मला सांगतात. जग सुरक्षित नाही. जवळ बंदूक ठेवा… असं देखील सैफ म्हणाला.
पुढे अभिनेता म्हणाला, ‘जवळ बंदूक ठेवली म्हणून असं काही होणार नाही… याची शाश्वती आपण देऊ शकत नही. कारण मला नाही वाटत की माझं आयुष्य धोक्यात आहे. मला असं वाटतं तो एक चोरी करण्याचा प्रयत्न होता, जो अपयशी ठरला… तो बिचारा… त्याचं आयुष्य माझ्या आयुष्यापेक्षा देखील वाईट आहे…’ सध्या सर्वत्र सैफची चर्चा रंगली आहे.