दहा महिन्यांनी इरफान खान मायदेशी परतला

मुंबई : अभिनेता इरफान खान भारतात परतला आहे. गेल्यावर्षी इरफान न्युरोअँडोक्राइन ट्युमर या आजारावर उपचार करण्यासाठी लंडनला गेला होता. त्यानंतर दहा महिन्यांनी इरफान उपचार पूर्ण करुन मायदेशी परतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आजाराबाबत आणि उपचाराबाबत सध्या काय स्थिती आहे, याची लवकरच मी अधिकृतपणे माहिती देईन, असे इरफानने सांगितले आहे. गेल्यावर्षी 16 मार्चला सोशल मीडियावर […]

दहा महिन्यांनी इरफान खान मायदेशी परतला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

मुंबई : अभिनेता इरफान खान भारतात परतला आहे. गेल्यावर्षी इरफान न्युरोअँडोक्राइन ट्युमर या आजारावर उपचार करण्यासाठी लंडनला गेला होता. त्यानंतर दहा महिन्यांनी इरफान उपचार पूर्ण करुन मायदेशी परतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आजाराबाबत आणि उपचाराबाबत सध्या काय स्थिती आहे, याची लवकरच मी अधिकृतपणे माहिती देईन, असे इरफानने सांगितले आहे. गेल्यावर्षी 16 मार्चला सोशल मीडियावर ओपन लेटरच्या माध्यमातून इरफानने आपल्या आजाराबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती.

इरफानला न्युरोअँडोक्राइन ट्युमर

इरफान खानने गेल्यावर्षी  मार्च महिन्यात ट्वीट करत आपल्या आजाराबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यात म्हटलं होत की, “मला न्युरोअँडोक्राइन ट्युमर आजार झाला आहे. यातून मी एक गोष्ट शिकलो की, अचानक सामोरे येणाऱ्या गोष्टी आपल्याला आयुष्यात पुढे घेऊन जातात. मला जेव्हा कळलं मला न्युरोअँडोक्राइन ट्युमर झाला आहे, तेव्हा मला ते सहन झालं नाही. मात्र आजुबाजूच्या लोकांचे प्रेम आणि इच्छाशक्तीमुळे मला बळ मिळालं आहे. त्यामुळे उपचार घेऊन लवकरच परतेन.”

आजारपणामुळे हे चित्रपट रखडले!

इरफान खान ‘सपना दीदी’ या विशाल भारद्वाजच्या चित्रपटासाठी काम सुरु करणार होते. ज्यामध्ये त्यांच्यासोबत दीपिका पादुकोण होती. मात्र आजारपणामुळे ते शुटिंग सुरु करु शकले नाही. नुकतेच विशाल भारद्वाज यांनी सांगितले की, जेव्हा इरफान खान सुरुवात करेल तेव्हाच चित्रपटाच्या कामाला सुरवात होईल.

कोण आहे इरफान खान?

इरफान खान यांचा 7 जानेवारीला 1967 मध्ये जयपूर येथे जन्म झाला आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्राममधून त्यांनी आपल्या अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले आहे. 1988 मध्ये मीरा नायर यांचा चित्रपट ‘सलाम बॉम्बे’मधून त्यांनी बॉलीवुडमध्ये आपल्या करियरला सुरुवात केली. यासाठी ऑस्कर पुरस्कारासाठीही त्याच नाव नॉमिनेट करण्यात आले होते.

Non Stop LIVE Update
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.