
मुंबई : अभिनेत्री रेखा कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. रेखा यांच्या आयुष्यात अनेकदा प्रेमाची एन्ट्री झाली, पण कोणत्याच अभिनेत्यांसोबत रेखा यांचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. रेखा यांनी अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं. चाहत्यांनी देखील रेखा यांना डोक्यावर घेतलं. प्रोफेशनल आयुष्यात रेखा यांना चाहत्यांकडून भरभरुन प्रेम मिळालं. पण खासगी आयुष्यात रेखा यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला.
अभिनय, सौंदर्य, डान्स, अदा… या सर्व गोष्टींमुळे रेखा यांनी फक्त चाहत्यांच्या मनावर नाही तर, अनेक सेलिब्रिटींच्या मनावर देखील राज्य केलं. एक काळ असा होता, जेव्हा रेखा यांचं अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडण्यात आलं. पण नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. रेखा यांच्या कडे आज सर्व काही आहे. पैसा, प्रसिद्धी, गडगंज संपत्ती.. सर्वकाही रेखा यांच्याकडे आहे. पण रेखा यांच्यानंतर अभिनेत्रीच्या संपत्तीवर कोणाचा हक्क असेल अशा अनेक चर्चा रंगलेल्या असतात.
गेल्या तीन दशकांपासून रेखा मोठ्या पडद्यावर राज्य करत आहेत. रेखा यांची नेटवर्थ ४० मिलियन डॉलर म्हणजे, जवळपास २५ अब्ज रुपये आहे. रेखा यांनी जवळपास २०० सिनेमांमध्ये काम केलं. आज रेखा बॉलिवूडपासून दूर असल्या तरी संपत्तीमध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना मागे टाकतात. रिपोर्टनुसार रेखा यांच्याकडे वांद्रे याठिकाणी आलिशान बंगला आहे. त्यांच्या बंगल्याची किंमत जवळपास १३ कोटी रुपये आहे.
रेखा यांच्या संपत्तीबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. अनेक जण म्हणतात की रेखा यांच्या संपत्तीचा हक्क फरजाना यांना मिळू शकतो. फरजाना यांच्यासोबत रेखा यांचं फार खास नातं आहे. फरजाना अनेक ठिकाणी रेखा यांच्यासोबत आसतात. फरजाना रेखा यांच्या मॅनेजर आहेत. त्यामुळे रेखा यांच्यानंतर फरजाना यांना अभिनेत्रीच्या संपत्तीचे अधिकार मिळू शकतात असं सांगण्यात येत आहे..
रेखा यांच्या सिदूरबद्दल सांगायचं झालं तर, 1982 मध्ये जेव्हा रेखा ‘उमराव जान’ सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार घेण्यासाठी आल्या होत्या तेव्हा तत्कालीन राष्ट्रपतींनी त्यांना विचारलं, ‘तुम्ही सिंदूर का लावता?’ यावर रेखा म्हणाल्या, ‘मी ज्या शहरातील आहे, त्याठिकाणी सिंदूर लावण्याची फॅशन आहे आणि मला सिंदूर लावयला आवडतं.. म्हणून मी लावते…’ रेखा आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्यातरी चाहत्यांमध्ये चर्चेत असतात.
रेखा यांच्या लव्हलाईफबद्दल सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर रेखा यांनी उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं. पण त्यांचं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या काही महिन्यांनंतर मुकेश यांनी स्वतःला संपवलं. लग्नाच्या काही महिन्यांनंतर मुकेश यांचा मृत्यू झाल्यामुळे रेखा यांना टीकेचा सामना करावा लागला.