
Kareena Kapoor And Saif Ali Khan: 2025 वर्षाच्या सुरुवातीलात अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान याच्या घरावर एक प्राणघातक हल्ला झाला. एका हल्लेखोर दोघांच्या घरात घुसला आणि त्याने धारदार ब्लेडने सैफ अली खान याच्यावर हल्ला केला. ज्यामुळे अभिनेता गंभीर जखमी देखील झालेले. आता याप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता रोनित रॉय याने धक्कादायक खुलासा केला आहे. सैफ याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर करीनावर देखील हल्ला झाला.
सैफ याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर कुटुंबाने सिक्योरिटी एजेन्सी बदलली आहे. या हल्ल्यानंतर, सर्व काही हाताळण्यासाठी रोनित रॉयच्या सुरक्षा एजन्सीची नियुक्ती करण्यात आली. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, रोनितने सैफच्या चाकूहल्ल्याच्या घटनेनंतर एक धक्कादायक घटना उघड केली.
रोनित म्हणाला, ‘सैफ याची रुग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर तो जेव्हा घरी परतत होता, तेव्हा पापाराझी आणि चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, करीना देखील रुग्णालयातून घरी परतत होती. तेव्हा तिच्या कारवर देखील छोटा हल्ला झाला.’
‘करीनाच्या कारला धक्का मारण्यात आला. या घटनेमुळे करीना पूर्णपणे घाबरली होती. अशात तिने मला फोन केला आणि सैफला घरी आणण्यासाठी सांगितलं. त्यानंतर मी सैफला घ्यायला गेलो आणि तो घरी पोहोचेपर्यंत आम्ही पूर्ण सुरक्षेची व्यवस्था केली होती. एवढंच नाही तर, पोलिसांकडूनही चांगलं सहकार्य मिळालं. आता सर्व काही ठीक आहे.’ असं देखील रोनित म्हणाला.
या घटनेनंतर, रोनित रॉयच्या सुरक्षा एजन्सीला सैफच्या घराची जबाबदारी देण्यात आली. रोनितने सांगितलं, जेव्हा त्याने सैफच्या घराची रेकी केली तेव्हा त्याला सुरक्षेत अनेक त्रुटी आढळल्या. त्याने अनेक आवश्यक बदल सुचवले, जे नंतर अंमलात आणण्यात आले.
16 जानेवारी 2025 मध्ये सैफ अली खान याच्या वांद्रे येथीस घरात एक अज्ञात व्यक्ती घूसला. ते जेहच्या खोलीच्या दिशेने जात होता. तेव्हात करातील स्टाफने गोंगाट केला आणि सैफ त्याच्या खोलीतून बाहेर आला. दोघांमध्ये मारहाण देखील झाली. हल्लेखोर अधिक आक्रमक होता. त्याने सैफवर 6 हल्ले केले. ज्यामुळे अभिनेता रक्तबंबाळ झाला.
हल्लयानंतर सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. दोघांनी देखील मुलं तैमूर अली खान आणि जेह अली खान यांच्यासाठी ‘नो फोटो पॉलिसी’ लागू केली आहे. आता सार्वजनिक ठिकाणी देखील तैमूर आणि जेह दिसत नाही.