गर्लफ्रेंडचा कार अपघातात गेला जीव, ‘या’ अभिनेत्यानेही संपवली जीवनयात्रा, मोठी खळबळ
नुकताच एक अत्यंत हैराण करणारी घटना पुढे आलीये. यामुळे मोठी खळबळ ही बघायला मिळतंय. अभिनेत्याच्या निर्णयामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. अभिनेत्रीचे कार अपघातात निधन झाल्याने अभिनेत्याला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलले.

नुकताच एक अत्यंत हैराण करणारी घटना घडलीये. या घटनेनंतर मोठी खळबळ बघायला मिळतंय. हेच नाही तर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलाय. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री पवित्रा जयाराम हिचा कार अपघातामध्ये मृत्यू झाला. यानंतर सर्वजण धक्क्यात असतानाच एका अभिनेत्याने आत्महत्या केलीये, यामुळेच मोठी खळबळ बघायला मिळतंय. अभिनेत्री पवित्रा जयाराम हिच्या मित्रानेच आत्महत्या केलीये. अभिनेता चंद्रकांत याने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. पवित्रा जयाराम आणि चंद्रकांत हे दोघे एकाच तेलुगु मालिकेत काम करत होते.
शुक्रवारी चंद्रकांतने तेलंगणातील अलकापूर येथील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पवित्रा जयाराम आणि चंद्रकांत हे दोघे एकमेकांना डेट करत होते. यांची भेट मालिकेच्या सेटवरची झाली होती. पवित्रा हिच्या निधनानंतर चंद्रकांतला अत्यंत मोठा धक्का बसल्याचे सांगितले जातंय. आता चंद्रकांतच्या वडिलांनी मोठा खुलासा केलाय.
अभिनेत्याच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत हा गेल्या काही दिवसांपासून खूप जास्त अस्वस्थ होता. पवित्रा हिच्या निधनानंतर त्याला धक्का बसला होता. हेच नाही तर पवित्राच्या निधनानंतर त्याने सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट देखील शेअर केली होती. हेच नाही तर त्याची पवित्रा विषयीचीच शेवटची पोस्ट देखील आहे.
चंद्रकांत याने ज्या घरात आपली जीवनयात्रा संपवली, त्याच घरात गेल्या काही दिवसांपासून पवित्रा आणि चंद्रकांत हे राहत होते. अशी एक चर्चा आहे की, लवकरच चंद्रकांत आणि पवित्रा हे आपल्या नात्याची घोषणा करणार होते. बेंगलुरू ट्रिपवरून आल्यावर ते नवीन नात्याला सुरूवात करणार होते. मात्र, पवित्राचा अपघात झाला आणि होत्याचे नव्हते झाले.
12 मे रोजी हैद्राबाद येथे पवित्राच्या कारचा अपघात झाला. बसची धडक कारला बसली आणि या अपघातामध्ये पवित्राचा जीव गेला. यावेळी कारमध्ये बहीण अपेक्षा, चालक श्रीकांत हे देखील होते. या अपघातानंतर तेलगू इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला होता. आता त्यामध्येच चंद्रकांत यानेही आत्महत्या केली. चंद्रकांत याने मोठा काळ मालिकांमध्ये गाजवला आहे.
