मिठात कुस्करलेल्या मिरच्या, तुपाची फोडणी; अभिनेत्री ऐश्वर्याने केलं काजूच्या बोंडूचं चमचमीत भरीत
अभिनेत्री ऐश्वर्या यांनी कोकणातील एक स्पेशल पदार्थाची रेसिपी करून दाखवली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

बॉलिवूड असो की मराठी सेलिब्रिटी यांच्या रेसिपीचे व्हिडीओ पाहायाला चाहत्यांना खूप आवडतं. कारण आपले आवडते सेलिब्रिटी कशा पद्धतीचे डाएट करतात? जेवणात कोणते पदार्थ खातात हे जाणून घ्यायला सर्वच चाहते उत्सुक असतात. असाच एका अभिनेत्रीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी एक रेसिपी दाखवली आहे. ही अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर.
कोकणातील स्पेशल रेसिपी
ऐश्वर्या नारकर त्यांचे डान्सचे व्हिडीओ तसेच, अनेकदा रेसिपीचे व्हिडीओही आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. सध्या त्या कोकणात सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी रानफेरीही केली आणि बागेतील ताज्या भाज्यांचा आनंद घेतला. या दरम्यान त्यांनी एक खास रेसिपीही बनवली आणि या रेसिपीचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
काजूच्या बोडांचं भरीत
कोकणात गेल्यावर ऐश्वर्या नारकर यांनी काजूच्या बोडांचं भरीत बनवलं. कोकणातील पारंपरिक आणि स्वादिष्ट असलेल्या या भरीताची रेसिपी त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एका व्हिडीओमधून शेअर केली आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी म्हटलं आहे की, “आज मी बनवणार आहे काजूच्या बोडांचं भरीत. खूप सोप्पं आणि टेस्टी”, म्हणत त्यांनी भरीताची टेस्टी रेसिपी सगळ्यांबरोबर शेअर केली आहे.”
View this post on Instagram
दरम्यान या व्हिडीओमध्ये त्या सुंदर साडी नेसून भरीत बनवताना दिसत आहेत. काडूचे बोंड विळीवर कापले अन् पुढे रेसिपी सांगताना त्यांनी अगदी घरगुती आणि आपुलकीच्या भाषेत सगळं दाखवलं आहे. एवढंच नाही तर त्या रेसिपी बनवत असताना व्हिडीओत पक्षांचे सुंदर, मधूर आवाज ही ऐकायला येत आहेत. या रेसिपीला सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळत आहे.
कोकणी पदार्थाचं कौतुक
ऐश्वर्या नारकर यांचं स्वतःचा युट्यूब चॅनल आहे. तिथे त्या नेहमी विविध रेसिपी आणि खास कोकणातील पदार्थ कसे बनवायचे याबाबत व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या व्हिडीओंना तेवढाच छान प्रतिसादही मिळतो. कोकणातील या स्पेशल रेसिपीचा त्यांनी जो व्हिडीओ पोस्ट केला आहे तो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. अनेकांनी त्यांच्या साधेपणाचं आणि खास कोकणी पदार्थाचं कौतुक केलं आहे.
