
मुंबई : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल सतत विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. हेच नाही तर काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चन याला बोलण्यासाठी त्याच्याजवळ जाताना दिसत आहे. मात्र, अभिषेक बच्चन हा ऐश्वर्या राय हिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून निघून जाताना दिसला. हेच नाही तर अशीही चर्चा होती की, ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडले आहे. आता या चर्चांमध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचा गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केलंय. हेच नाही तर यांचे अफेअर खुल्लम खुल्ला होते. सलमान खान आणि ऐश्वर्या राय लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. मात्र, अचानक एका वाईट मार्गावर सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर थेट बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय ही झाली. 2007 मध्ये ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले.
सध्या सोशल मीडियावर सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या गाण्याचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. यासोबतच काही खास जुने फोटोही व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये दोघांच्या चेहऱ्यावरील प्रेम साफ दिसतंय. हम दिल दे चुके सनम या चित्रपटात सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची केमिस्ट्री ही बघायला मिळाली. तेंव्हाच या दोघांची जोडी तूफान चर्चेत आली. लोकांना याच चित्रपटातून यांची जोडी आवडली.
विशेष म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या लव्ह स्टोरीची सुरूवातही हम दिल दे चुके सनम चित्रपटापासूनच झाली. या चित्रपटाच्या शूटिंगपासूनच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय हे परफॉर्म करताना दिसत आहेत. दोघेही एकमेकांसोबत छान दिसत आहेत. व्हायरल होणारा व्हिडीओ त्यांच्या हम दिल दे चुके चित्रपटातील आहे.
या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचे एक्सप्रेशन जबरदस्त दिसत आहेत. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. आता या फोटोनंतर हा त्यांच्या चित्रपटातील गाण्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.