AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयस्कर महिलांना पाहण्याची सवय..; ‘कान्स’मधील ऐश्वर्याच्या लूकची खिल्ली उडवणाऱ्यांना कंगना यांचं सडेतोड उत्तर

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील लूकवरून ऐश्वर्या राय बच्चनला ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. कंगना यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वयस्कर महिलांना पाहण्याची सवय..; 'कान्स'मधील ऐश्वर्याच्या लूकची खिल्ली उडवणाऱ्यांना कंगना यांचं सडेतोड उत्तर
Aishwarya Rai and Kangana RanautImage Credit source: Instagram
| Updated on: May 25, 2026 | 10:01 AM
Share

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन जोपर्यंत रेड कार्पेटवर येत नाही, तोपर्यंत जगप्रसिद्ध ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ परिपूर्ण वाटत नाही, असं अनेकदा म्हटलं जातं. यावर्षीही चाहते ऐश्वर्याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर लेक आराध्या बच्चनसोबत ऐश्वर्या या अत्यंत प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात पोहोचली. यावेळी तिच्या लूकची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. काही नेटकरी ऐश्वर्याच्या निळ्या गाऊनमधील लूकचं कौतुक करत आहेत, तर काहीजण वय आणि स्टाइलवरून तिच्यावर टीका करत आहेत. या चर्चांवर आता खुद्द अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी मोकळेपणे मत मांडत ट्रोलर्सना खडेबोल सुनावले आहेत.

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील ऐश्वर्याच्या लूकवरून सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेला आता कंगना यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. कोणतीच महिला कोणाला खुश करण्यासाठी रेड कार्पेटवर येत नाही, असं तिने स्पष्ट म्हटलंय. कान्स 2026 मध्ये ऐश्वर्याने डिझायनर अमित अग्रवालने डिझाइन केलेला निळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. हा ड्रेस तयार करण्यासाठी जवळपास 1500 तास लागल्याचं म्हटलं जातंय. ऐश्वर्याचा हा लूक समोर येताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. काहींनी तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली तर काहींनी तिच्या वयावरून आणि स्टाइलवरून नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.

कंगना यांची पोस्ट-

कंगना राणौत यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ऐश्वर्याचा निळ्या गाऊनमधील फोटो पेस्ट केला. त्यावर त्यांनी लिहिलं, ‘फॅशन आणि स्टाइल ही प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक निवड आणि अभिव्यक्ती असते. कोणतीही स्त्री केवळ इतरांना खुश करण्यासाठी जगत नाही. ऐश्वर्या या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. जर काही लोकांना तिच्याकडे वेगळ्या नजरेनं पहायचं असेल, तर त्यांनी आधी स्वत:कडे पहावं. ऐश्वर्या कोणालाही खुश करण्यासाठी रेड कार्पेटवर येत नाही, तर ती तिच्या आत्मविश्वासाने आणि तिच्या वैशिष्ट्यपूर्ण ओळखीसह तिथे उपस्थित राहण्यासाठी येते.’

यावेळी कंगना यांनी वयाबद्दलच्या टिप्पण्यांवरही नाराजी व्यक्त केली. “जर लोकांना रेड कार्पेटवर वयस्कर महिलांना पहायची सवय नसेल, तर त्यांनी आता ती सवय करून घेतली पाहिजे. ऐश्वर्या राय बच्चन 20 वर्षांहून अधिक काळ कान्स फिल्म फेस्टिव्हलचा भाग राहिली आहे. तिचे रेड कार्पेटवरील लूक्स दरवर्षी चर्चेचा विषय ठरतात आणि जगभरातील फॅशनप्रेमी तिच्या स्टायलिंगची आतुरतेने वाट पाहतात”, अशा शब्दांत तिने ट्रोलर्सना फटकारलं आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा