‘ऐश्वर्या सासऱ्यांसोबत असते तेव्हा…’, बच्चन कुटुंबाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Aishwarya Rai Bachchan enjoys with family : बच्चन कुटुंबाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांना पाहून म्हणाल..., सोशल मीडियावर फक्त आणि फक्त बच्चन कुटुंबाची चर्चा...

मुंबई | 7 जानेवारी 2024 : गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबातील वाद चर्चेत आहेत. अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा देखील तुफान रंगल्या होत्या. पण अभिषेक याने मुलाखतीत रंगणाऱ्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. आता बच्चन कुटुंबाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ऐश्वर्या पती अभिषेक बच्चन, सासरे अमिताभ बच्चन आणि लेक आराध्या बच्चन यांच्यासोबत दिसत आहे. व्हिडीओमध्ये बच्चन कुटुंब आनंदी दिसत आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ कब्बडी सामन्या दरम्यानचा आहे.
शनिवारी 6 जानेवारीच्या रात्री बच्चन कुटुंब मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियममध्ये पोहोचले. प्रो कबड्डी लीगमध्ये बच्चन कुटुंब सामील झालं होतं. सामन्या दरम्यान, तिघेही अभिषेकसोबत स्टँडमध्ये बसले होते आणि त्यांनी जयपूर पिंक पँथर्सची जर्सी घातली होती. जयपूर पिंक पँथर्सचा सामना यू मुंबा टीमसोबत रंगला होता.
जयपूर पिंक पँथर्स टीमने सामना जिंकल्यानंतर अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, आराध्या बच्चन यांना प्रचंड आनंद झाला. कारण जयपूर पिंक पँथर्स ही टीम अभिषेक बच्चन याची आहे. सांगायचं झालं तर, अमिताभ यांच्यासोबत ऐश्वर्या आणि आराध्या यांना पाहून चाहत्यांना देखील प्रचंड आनंद झाला आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त बच्चन कुटुंबाच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे. व्हिडीओ कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘जया बच्चन यांची कमतरता भासत आहे…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ऐश्वर्या सासऱ्यांसोबत असते तेव्हा कायम आनंदी दिसते…’ चाहत्यांना बच्चन कुटुंबाचा व्हिडीओ आवडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती. पण आता समोर आलेल्या व्हिडीओनंतर बच्चन कुटुंबात कोणतेही वाद नसल्याचं चित्र दिसत आहे. एवढंच नाही तर, आराध्या हिच्या एनूअल डे कार्यक्रमासाठी देखील ऐश्वर्या – अभिषेक एकत्र दिसले. ऐश्वर्या – अभिषेक यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या – अभिषेक यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. लग्नानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या हिला जन्म दिला. ऐश्वर्या – अभिषेक यांची लेक आराध्या 12 वर्षांची आहे.
