कंगना रनौत – जावेद अख्तर यांच्यातील वाद पुन्हा चर्चेत, अभिनेत्रकडून याचिका दाखल कारण…
Kangana Ranaut : कंगना रनौत पुन्हा वादाच्या भोवऱ्यात... बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबत असलेले वाद पुन्हा चर्चेत.. अभिनेत्रीने ठोठावला न्यायालयाचा दरवाजा... काय आहे पूर्ण प्रकरण...

ब्रिजभान जैस्वार, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, मुंबई | मुंबई | 7 जानेवारी 2024 : कायम वादाचा मुकूट स्वतःच्या डोक्यावर घेऊन मिरवणारी अभिनेत्री कंगना रनौत कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनेक वादग्रस्त परिस्थितीत कंगना हिचं नाव पुढे आलं आहे. ज्यामुळे अभिनेत्रीला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागला आहे. आता पुन्हा एका मोठ्या कारणामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबत देखील कंगना हिचे वाद आहेत. दोघांचे वाद कोर्टापर्यंत देखील पोहोचले आहेत. कंगना हिने जावेद अख्तर यांनी केलेल्या मानहानीच्या तक्रारीच्या आधारे तिच्याविरुद्धच्या खटल्याला स्थगिती देण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली आहे.
कंगना हिने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठासमोर 9 जानेवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रिपोर्टनुसार, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या टिप्पणीमुळे नाराज झालेल्या अख्तर यांनी कंगना हिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. आता याप्रकरणी 9 जानेवारी काय होतं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सांगायचं झालं तर, कंगना हिने केलेलं वक्तव्य 2016 मध्ये तिच्या आणि जावेद अख्तर यांच्या भेटीशी संबंधीत आहे. अंधेरीच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी अख्तर यांना जुलैमध्ये समन्स बजावलं होतं. दिंडोशी कोर्टाने अख्तर यांच्या अर्जावर सुनावणी होईपर्यंत कंगनाच्या तक्रारीवरील आदेश आणि खटल्याच्या कार्यवाहीला स्थगिती दिली आहे. सध्या सर्वत्र कंगना आणि जावेद अख्तर यांच्यातील वादाची चर्चा रंगली आहे.
कंगना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही, जेव्हा अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. याआधी देखील अनेक प्रकरणांमुळे कंगना हिला अनेकांच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्री कायम बॉलिवूडच्या कोणालाही माहिती नसलेल्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असते.
कंगना हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ‘इमर्जन्सी’ या सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणारआहे, ज्यामध्ये अभिनेत्री माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमात कंगना हिच्यसोबत अनुपम खेर, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. कंगना सोशल मीडियावर देखील कामय सक्रिय असते.
