अभिषेक बच्चन – ऐश्वर्या राय यांच्यात रोज होतात वाद? खुद्द अभिनेत्रीकडून मोठा खुलासा

Abhishek Bachchan : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण, ऐश्वर्या म्हणाली, 'आमच्यात रोज वाद होतात...', यावर अभिषेक म्हणाला...; सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याची चर्चा

अभिषेक बच्चन - ऐश्वर्या राय यांच्यात रोज होतात वाद? खुद्द अभिनेत्रीकडून मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Dec 05, 2023 | 10:04 AM

मुंबई | 5 डिसेंबर 2023 : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नात्याच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगत असतात. अभिषेक – ऐश्वर्या कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून अभिषेक – ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र दिसत नाहीत. कार्यक्रम किंवा कोणत्याही ठिकाणी ऐश्वर्या लेक आराध्या हिच्यासोबत पोहोचते. नुकताच ऐश्वर्या हिचा वाढदिवस झाला. तेव्हा ऐश्वर्या हिच्यासोबत फक्त आई आणि मुलगी होती. अभिषेक बच्चन याने सोशल मीडियावर फक्त पत्नीचा फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या. अशात दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं..

धक्कादायक गोष्ट म्हणजे अभिषेक याने साखरपुड्याची अंगठी काढल्याची चर्चा देखील गेल्या काही दिवसांपासून तुफान रंगत आहे. दरम्यान अभिषेक – ऐश्वर्या यांनी जुन्या मुलाखतीत केलेलं वक्तव्य तुफान व्हायरल होत आहे. ‘अभिषेक आणि माझ्यात रोज वाद होतात…’ असं वक्तव्य ऐश्वर्या हिने 2010 मध्ये झालेल्या एका मुलाखतीत केलं होतं.

ऐश्वर्या हिने केलेल्या वक्तव्यावर अभिषेक म्हणाला, ‘आमच्यामध्ये होणारे वादनसून असहमती असते. हे वाद क्षणात मिटणारे असतात. महत्त्वाचं म्हणजे नात्यात उतार – चढाव येत असतात. ते नसतील तर आयुष्य पुर्णपणे बोरिंग होईल.. आम्ही आमच्यातील असहमती दूर करण्याचा प्रयत्न करतो.’ एवढंच नाही तर तेव्हा अभिनेत्याने पुरुषांना एक सल्ला देखील दिला होता. ‘महिला कायम योग्य असतात आणि त्या राहातील… हे गोष्ट पुरुषांना कळली तर, त्यांचं आयुष्य अधिक सोपं होईल…’

हे सुद्धा वाचा

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा विचार केला. 20 एप्रिल 2007 मध्ये अभिषेक – ऐश्वर्या यांनी कुटुंबिय आणि मित्र-परिवाराच्या उपस्थितीत लग्न केलं. लग्नानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या हिला जन्म दिला. आराध्या हिने आई-वडिलांसोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

अभिषेक – ऐश्वर्या दोघे आराध्या हिचा फोटो पोस्ट करत लेकीवर असलेलं प्रेम व्यक्त करत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून अभिषेक – ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. आराध्या हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना देखील अभिषेक – ऐश्वर्या यांनी फक्त आराध्या हिच्यासोबत फोटो पोस्ट केलं. म्हणून अभिषेक – ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. पण रंगणाऱ्या घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक – ऐश्वर्या यांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

Non Stop LIVE Update
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार.
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर.
'वडीलांबद्दल पातळी सांभाळून बोला, मी पण...,' काय म्हणाल्या अंकिता पाटी
'वडीलांबद्दल पातळी सांभाळून बोला, मी पण...,' काय म्हणाल्या अंकिता पाटी.
मी माझा मालक आहे, आमचं अजून....,' काय म्हणाले प्रकाश आंबेडकर
मी माझा मालक आहे, आमचं अजून....,' काय म्हणाले प्रकाश आंबेडकर.
गुवाहाटीत आमदाराने एअर होस्टेसचा विनयभंग केला, ॲड. असीम सराेदे
गुवाहाटीत आमदाराने एअर होस्टेसचा विनयभंग केला, ॲड. असीम सराेदे.
कल्याण लोकसभा निवडणूक लढविणार का? काय म्हणाले राजू पाटील
कल्याण लोकसभा निवडणूक लढविणार का? काय म्हणाले राजू पाटील.
इंदापूरात फिरु न देण्याची धमकी, हर्षवर्धन पाटील यांचे फडणवीसांना पत्र
इंदापूरात फिरु न देण्याची धमकी, हर्षवर्धन पाटील यांचे फडणवीसांना पत्र.
Video | 1936 पासूनच्या विण्टेज कार आणि बाईकचे प्रदर्शन
Video | 1936 पासूनच्या विण्टेज कार आणि बाईकचे प्रदर्शन.
'प्रकाश आंबेडकरकरांवर काही मायावतींसारखा...,' काय म्हणाले संजय राऊत
'प्रकाश आंबेडकरकरांवर काही मायावतींसारखा...,' काय म्हणाले संजय राऊत.
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल.