सलमान खान सोबत भिडण्याची ताकद ऐश्वर्यामध्येच होती – प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य

Salman Khan and Aishwarya Rai | 'या' अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य, ब्रेकअपनंतर म्हणाली, 'सलमान खान सोबत भिडण्याची ताकद ऐश्वर्यामध्येच होती..', अनेक वर्षांनंतर देखील सलमान खान - ऐश्वर्या राय यांच्या नात्याची चर्चा रंगलेली असते...

सलमान खान सोबत भिडण्याची ताकद ऐश्वर्यामध्येच होती - प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
Salman Khan and Aishwarya Rai
| Updated on: Sep 23, 2024 | 3:48 PM

अभिनेता सलमान खान याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत भाईजानचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. सलमान खान याच्या गर्लफ्रेंड्सच्या यादीमध्ये अभिनेत्री सोमी अली हिचं देखील नाव आहे. रिपोर्टनुसार, सलमान खान अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्यासोबत लग्न करणार होता. पण लग्नाच्या पत्रिका छापल्यानंतर संगीता हिने सलमान – सोमी यांना रंगे हात पकडलं… ज्यामुळे सलमान खान याच्यासोबत असलेले सर्व संबंध संगीता हिने मोडले. पण आजही दोघे चांगले मित्र आहेत.

एक मुलाखतीत सोमी हिने सलमान खान याच्याबद्दल मोठा खुलासा केला होता. तेव्हा सलमान खान गुपचूप मला भेटण्यासाठी यायचा. सलमान खान – संगीता बिजलानी एकमेकांना डेट करत होते आणि त्यांच्या लग्नाची तयारी देखील सुरु झाली होती. पण दोघांचं लग्न होऊ शकलं नाही.

पुढे सोमी म्हणाली, ‘एकदा समलान खान मला भेटण्यासाठी आला होता आणि तेव्हाच संगीताने दरवाजा ठोठावला. तेव्हा सलमानने माझ्याकडून 10 मिनिटं मागितली आणि सलमान खान आता नातं संपवेल असं मला वाटलं. कारण संगीता सोबत त्याच्या लग्नाची तयारी सुरु होती पत्रिका देखील छापल्या होत्या..’ पण असं काहीही झालं नाही.

सोमी अली हिला डेट करत असताना सलमान खान याच्या आयुष्यात अभिनेत्री ऐश्वर्या राय हिची एन्ट्री झाली. ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान सलमान – ऐश्वर्या यांच्यामध्ये प्रेम बहरलं. दोघांच्या नात्याच्या चर्चा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील रंगू लागल्या.

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या – सलमान यांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत चाहते होते. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याने भाईजानवर गंभीर आरोप केले. दोघांचे वाद पोलिसांपर्यंत पोहोचले होते.

रिपोर्टनुसार, ऐश्वर्या हिच्या वडिलांनी सलमान खान विरोधात पोलीस तक्रार देखील केली होती. सलमान – ऐश्वर्या यांच्या भांडणांची चर्चा सर्वत्र रंगल्यानंतर, ‘सलमान खान याच्यासोबत भिडण्याची ताकद फक्त ऐश्वर्या हिच्यामध्ये होती…’ असं वक्तव्य देखील सोमी अली हिने केलं होतं.

सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीने लेक आराध्या हिला जन्म देखील दिला. पण सलमान खान याने लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही. वयाच्या 58 व्या वर्षी देखील अभिनेता एकटाच आयुष्य जगत आहे.