AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aishwarya Rai ची नणंद, श्वेता बच्चनमुळे मोडलं कंगना-हृतिकचं नातं ?

गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यातील मतभेदाच्चाय, त्यांच्या घटस्फोटाबद्दलच्या अनेक अफवा समोर येत आहे. दोघांच्या नात्यावरून, बच्चन कुटुंबावरूनही खूप चर्चा सुरू आहे. पण हे काही पहिल्यांदाच घडत नाहीये. यापूर्वीही बच्चन कुटुंबाबद्दल अनेक अफवा उठल्या. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन ही तिचा पती निखिल नंदा याच्यापासून विभक्त होत असल्याच्या चर्चाही बऱ्याच काळ सुरू होत्या.

Aishwarya Rai ची नणंद, श्वेता बच्चनमुळे मोडलं कंगना-हृतिकचं नातं ?
श्वेता बच्चनमुळे मोडलं कंगना-हृतिकचं नातं ?
| Updated on: Sep 26, 2024 | 1:47 PM
Share

प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या तिच्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत आहे. अनेक दिवसांपासून तिच्या आणि अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाच्या अफवा पसरत आहेत. मात्र याच दरम्यान, पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या रायने तिच्या खास शैलीत रॅम्पवॉक केला आणि हातात लग्नाची अंगठी पुन्हा घालून या सर्व अफवांना पूर्णविराम दिला. मात्र बच्चन कुटुंबातील कोणीतरी विभक्त होण्याच्या बातम्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेकदा असे रिपोर्ट्स आले होते की अमिताभ यांची लेक श्वेता बच्चन ही तिचा पती निखिल नंदा यांच्यापासू विभक्त होणार आहे. दोघंही वेगवेगळे राहतात, तर त्यांची मुल नव्या आणि अगस्त्य हे दोघे श्वेतासोबत राहतात. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान आका सोशल मीडियावर नेटीझन्सनी श्वेता बच्चन नंदा हिला हृतिक रोशनच्या नावाने ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.

खरंतर अभिषेक बच्चन आणि हृतिक रोशन हे बालपणीचे मित्र आहेत. हृतिकची श्वेता नंदासोबतही चांगली मैत्री आहे. 2014 साली हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान खान हे दोघे वेगळे झाले. आधी दोघांचाही आनंदाने संसार सुरू होता. मात्र नंतर ते विभक्त झाले. सुझानपासून वेगळं झाल्यावर, लग्न मोडल्यावर हृतिकची त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीशी, श्वेताशी जवळीक वाढली,असा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला.

हृतिक श्वेताची जवळीक कशी वाढली ?

हृतिक रोशनच्या पायाला गंभीर दुखापत झाली तेव्हा अभिषेक बच्चन अनेकदा त्याला भेटायला यायचा. तेव्हा श्वेताही त्याच्यासोबत असायची असा दावा अनेक रिपोर्ट्समधून करण्यात आला. तेव्हा त्यांनी बराच वेळ एकत्र घालवला. पण त्यांची मैत्री संपल्यानंतर कुणाल कपूरचे लग्न झाल्यावर ते एकत्र आले. अनेक पार्टी आणि लग्नसोहळ्यांमध्ये ते एकत्र स्पॉट झाले होते.

याच काळात श्वेता नंदा यांनी मुंबईत स्टायलिस्ट म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यांची दोन मुले अगस्त्य आणि नव्या नवेली हे बोर्डिंगला गेले होते. लग्नानंतर लगेचच श्वेता नंदा दिल्ली सोडून मुंबईत होती. श्वेता नंदा आपल्या पतीपासून विभक्त झाल्याचाही अनेक रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला. पण कुटुंबामुळे तिने घटस्फोटासाठी अर्ज केला नाही.

नातं का टिकलं नाही ?

श्वेता बच्चन आणि हृतिक रोशनच्या डेटींगच्या अफवेमुळे बराच ड्रामा झाला. रिपोर्ट्सनुसार, श्वेतामुळे हृतिक रोशन आणि कंगना राणौत हे दोघेही दुरावले होते. पण यात किती तथ्य आहे हे फक्त ते जोडपचं सांगू शकेल. खरंतर श्वेता बच्चन आणि सुझान खान याही खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. मात्र, हृतिक आणि श्वेता यांच्या जवळीकांमुळे सुझानला खानला नेहमीच अडचण वाटत होती.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.