‘गंगूबाई काठियावाडी’चे शूटिंग सुरू, अजय देवगणही चित्रीकरणात व्यस्त; पाहा फोटो

अजय देवगणने शनिवारपासून गंगूबाई काठियावाडी चित्रपटाची शूटिंग सुरू केली आहे.

'गंगूबाई काठियावाडी'चे शूटिंग सुरू, अजय देवगणही चित्रीकरणात व्यस्त; पाहा फोटो

मुंबई : ‘हम दिल दे चुके सनम’ (Hum Dil De Chuke Sanam) या सुपरहिट चित्रपटानंतर अजय देवगण आणि संजय लीला भन्साळी आता परत एकदा गंगूबाई काठियावाडी चित्रपटात काम करणार आहेत. अजय देवगणने (Ajay Devgan) शनिवारपासून गंगूबाई काठियावाडी चित्रपटाची शूटिंग सुरू केली आहे. याची माहिती स्वत: अजय देवगणने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. (Ajay Devgan’s Gangubai Kathiawadi movie Shooting started)

अजय देवगणने सोशल मीडियावर संजय लीला भन्साळीसोबत एक फोटो शेअर करत लिहिले आहे की, दोन दशकांनंतर संजयच्या सेटवर खूप चांगले वाटत आहे. 1999 चा सुपरहिट चित्रपट ‘हम दिल दे चुके सनम’ नंतर तब्बल 22 वर्षांनी अजय देवगण आणि संजय लीला भन्साळीसोबत काम करत आहेत. या चित्रपटात अजय देवगनसोबत सलमान खान आणि ऐश्वर्या राॅय मुख्य भूमिकेत होते.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकाच्या धर्तीवर संजय लीला भन्साळी यांना गंगूबाई काठियावाडी यांचे जीवन आणि त्यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर दाखवायचा आहे. परंतु, त्याआधीच हा चित्रपट अडचणीत आला होतं. एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, गंगूबाईच्या मुलाने असे म्हटले आहे की, हुसेन जैदीच्या पुस्तकाचे काही भाग त्यांचे वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणणारे असून, यामुळे कुटुंबाची बदनामी होऊ शकते.

त्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण त्वरित थांबवावे आणि पुस्तकातील काही आक्षेपार्ह भाग चित्रपटाच्या कथेतून वगळावेत, अशी त्यांची इच्छा आहे. आलिया भट्ट, संजय लीला भन्साळी आणि हुसेन जैदी यांच्याविरूद्ध महिलांचे आक्षेपार्ह तसेच, एखाद्याचे गोपनीय वैयक्तिक आयुष्य प्रसारित केल्याबद्दल गंगुबाई याचा मुलगा बाबूजी रावजी शाह यांचे वकील फौजदारी तक्रार दाखल करू शकतात, अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत होती.

संबंधित बातम्या : 

चाहत्याने मागितला चक्क स्मार्टफोन, सोनूने दिले ‘हे’ भन्नाट उत्तर!

Video: अंकिता लोखंडेचा ‘तो’ व्हिडीओ येताच चाहत्यांकडून अनफॉलो; कमेंट्समध्ये काय लिहलं तुम्हीच वाचा!

Amitabh Bachchan Health Update : अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली, ब्लॉग शेअर करत म्हणाले…

(Ajay Devgan’s Gangubai Kathiawadi movie Shooting started)

Published On - 1:47 pm, Sun, 28 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI