भारताचा चीनला सर्वात मोठा झटका, थेट कारवाई, जग हादरलं, भारतीय बाजारपेठेत…
अमेरिकेने भारतावर लावलेल्या 50 टक्के टॅरिफनंतर भारत आणि चीनमधील संबंध पूर्वीपेक्षा चांगले झाले. हेच नाही तर चीनने यादरम्यान भारतासोबत काही महत्वाचे व्यापार करारही केले. आता भारताने चीनला इंगा दाखवला आहे.

अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर अनेक वर्षातील तणावपूर्ण संबंध भारत आणि चीनमधील सुधारली. भारतावरील टॅरिफ अन्यायकारक असल्याचे सांगत अमेरिकेविरोधात चीनने भूमिका घेतली. फक्त भूमिकाच नाही तर थेट अमेरिकेच्या विरोधात चीन मैदानात आल्याचे बघायला मिळाले. यादरम्यान काही महत्वाचे करार चीनने भारतासोबत केले. भारतातून चीनमध्ये होणारी निर्यात देखील वाढवण्यात आली. आता भारताने या महिन्यात दोन चिनी उत्पादनांवर अँटी-डंपिंग शुल्क लावले आहे. यापैकी एक उत्पादन रेफ्रिजरंट गॅस आहे आणि दुसरे विशिष्ट प्रकारचे स्टील उत्पादन आहे. ही दोन्ही उत्पादने भारतात त्यांच्या सामान्य बाजारभावापेक्षा कमी किंमतीत विकली जात होती. ज्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावे लागत होते. यामुळे भारताकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मुळात म्हणजे भारताने हे पाऊस देशांतर्गत उद्योगांना संरक्षण देण्याकरिता उचलले असून त्यानुसार त्यांनी ही कारवाई केली
अर्थ मंत्रालयाच्या सूचनेनुसार, भारताने काही चिनी कंपन्यांच्या पोलाद उत्पादनांवर प्रति टन 223. 82 डॉलर्स आणि इतर कंपन्यांच्या उत्पादनांवर प्रति टन 415 डॉलर्स इतके अँटी-डंपिंग शुल्क पाच वर्षांच्या कालावधीसाठी लावले आहे. एका स्वतंत्र अधिसूचनेत भारताने व्हिएतनाममधून निर्यात होणाऱ्या कॅल्शियम कार्बोनेट फिलर मास्टरबॅचवर अँटी-डंपिंग शुल्क लावण्याची घोषणा केली. डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेड रेमेडीज’द्वारे केलेल्या स्वतंत्र तपासानंतर हे पाऊल उचलण्यात आले.
भारताने थेट दोन चीनी कंपन्यांविरोधात हे मोठे पाऊस उचलले आहे. भारताने यापूर्वी चीनसह विविध देशांमधून येणाऱ्या स्वस्त आयातीला सामोरे जाण्यासाठी अनेक उत्पादनांवर अँटी-डंपिंग शुल्क लावले आहे. जर हे असेच सुरू राहिले तर त्याचा थेट फटका देशातील उत्पन्नाला बसतो, यामुळे अशा उत्पादनावर अँटी-डंपिंग शुल्क आकारले जाते. चीन आणि भारतातील संबंध सध्या चांगले आहेत.
असे असतानाही भारताने दोन चीनी कंपन्यांवर ही कारवाई केली. भारत आता चीनमध्ये होणारी निर्यात वाढवण्यावर भर देत आहे. अमेरिकेने भारतावर लावलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे अमेरिकेत होणारी निर्यात कमी झाली. भारत दुसऱ्या देशांमध्ये निर्यात वाढवताना दिसत आहे. भारताने अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार देखील केली आहेत.
