Raid 2 Review: अजय देवगनचा पॉव्हरफुल अंदाज तर रितेश देशमुखची ‘टॉप क्लास’ ॲक्टिंग, सिनेमाला चाहत्यांची पसंती

Raid 2 Review: दादाभाई आणि सामान्य माणसातील लढाई पाहून लोक उत्साहित, प्रत्येक सीनमधील ट्विस्ट आणि सस्पेन्स थरारक..., सोशल मीडियावर फक्त आणि फक् सिनेमाची चर्च...

Raid 2 Review: अजय देवगनचा पॉव्हरफुल अंदाज तर रितेश देशमुखची टॉप क्लास ॲक्टिंग, सिनेमाला चाहत्यांची पसंती
फाईल फोटो
| Updated on: May 01, 2025 | 1:06 PM

अभिनेता अजय देवगन पुन्हा मोठ्या पडद्यावर स्वतःचं वर्चस्व गाजवण्यासाठी आला आहे. अजय आता मोठ्या पडद्यावर भ्रष्टाचार आणि सत्ता मिळण्यासाठी प्रयत्नात असलेल्या राजकारणी व्यक्तींसोबत लढताना दिसत आहे. ‘रेड’ च्या यशानंतर, अजय देवगन ‘रेड’ च्या सिक्वेलमध्ये आयकर अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत परतत आहे. सिनेमात अभिनेता रितेश देखमुख याने देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सिनेमात रितेशने दादाभाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त ‘रेड 2’ सिनेमाची चर्चा रंगली आहे .

एक्सवर एका चाहता म्हणाला, ‘रेड 2′ एका रचनात्मक सिनेमा आहे. सिनेमात अजय देवगन, रितेश देशमुख, सौरभ शुक्ला, सुप्रिया पाठक आणि वाणी कपूर यांनी जबरदस्त काम केलं आहे.’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘अजन देवगन जेव्हा पंचलाईन देतो तेव्हा अभिनेता त्याच्या डोळ्यांनी फार काही बोलून जातो…’

 

 

 

 

 

 

 

रितेश देशमुखने देखीस भ्रष्ट राजकारणी म्हणून दमदार भूमिका साकारली आहे. रितेश अजयला मोठ्या पडद्यावर कठीण स्पर्धा देताना दिसत आहे. हा सिनेमा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो… असं देखील चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणत आहेत.

‘रेड 2’ सिनेमाची निर्मिती मेकर भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार यांनी केली आहे. राज कुमार दिग्दर्शित ‘रेड 2’ हा सिनेमा आधी 15 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, तो पुढे ढकलण्यात आला. आता तो 1 मे 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.