Ajith Kumar Fan Dies: अजीत कुमारच्या चाहत्याचा दुर्दैवी मृत्यू; चालत्या गाडीतून मारली उडी

थिएटरबाहेर फटाके फोडून आणि डान्स करून त्यांनी आनंद साजरा केला. मात्र या जल्लोषादरम्यान एका चाहत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना तमिळनाडूमध्ये घडली आहे.

Ajith Kumar Fan Dies: अजीत कुमारच्या चाहत्याचा दुर्दैवी मृत्यू; चालत्या गाडीतून मारली उडी
Ajith Kumar Fan Dies: अजीत कुमारच्या चाहत्याचा दुर्दैवी मृत्यूImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 1:58 PM

(Ajith Kumar Fan Dies) चेन्नई: तमिळ चित्रपटांमधील सुपरस्टार अजीत कुमारच्या ‘थुनिवू’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बरेच चाहते थिएटरमध्ये पोहोचले. थिएटरबाहेर फटाके फोडून आणि डान्स करून त्यांनी आनंद साजरा केला. मात्र या जल्लोषादरम्यान एका चाहत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना तमिळनाडूमध्ये घडली आहे. तमिळनाडूमधल्या एका थिएटरमध्ये अजीत कुमारच्या थुनिवू हा चित्रपटाचा शो लागला होता. अजीतला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती.

चित्रपटाच्या प्रदर्शनाचा आनंद साजरा करताना चाहत्यांनी थिएटरबाहेर फटाके फोडले आणि डान्स केला. अजीत कुमारच्या या चित्रपटासोबतच थलपती विजयचा ‘वारिसु’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित झाला. त्याचे चाहतेसुद्धा मोठ्या संख्येने तिथे जमा झाले. मात्र यादरम्यान एक दुर्घटना घडली. अजीत कुमारच्या एका चाहत्याचा यात मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, भरत कुमार नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. अजीतचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानिमित्त तो इतका उत्साहित झाला की त्याने चालत्या लॉरीमधून उडी मारली. ही लॉरी धीम्या गतीनेच चालत होती. मात्र वरून उडी मारल्याने भरत कुमार गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.

ही घटना चेन्नईमधील रोहिणी थिएटरजवळ पूनमल्ली हायवेवर घडली. अजीत कुमारचा हा चाहता पहाटे 1 वाजता चित्रपट पाहण्यासाठी गेला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. थुनिवू हा चित्रपट 11 जानेवारी रोज प्रदर्शित झाला. यामध्ये अजीत कुमारसोबत मंजू वॉरियर, प्रेम कुमार, पवनी रेड्डी आणि चिराग जानी यांच्याही भूमिका आहेत. बोनी कपूरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.