AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वातंत्र्यदिनी अक्षय आणि टायगर श्रॉफने मैदानात केलं ध्वजारोहण, खिलाडी कुमारच्या कृतीने मन जिंकलं Video

भारताला स्वातंत्र्य मिळून 15 ऑगस्ट 2026 रोजी 80 वर्षे पूर्ण झाली आहे. संपूर्ण देशात ध्वजारोहण करून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलिवूड स्टार आणि ॲक्शन स्टार्स म्हणून ख्याती असलेल्या अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी ध्वजारोहण करत हा दिवस साजरा केला.

स्वातंत्र्यदिनी अक्षय आणि टायगर श्रॉफने मैदानात केलं ध्वजारोहण, खिलाडी कुमारच्या कृतीने मन जिंकलं Video
स्वातंत्र्यदिनी अक्षय आणि टायगर श्रॉफने मैदानात केलं ध्वजारोहण, खिलाडी कुमारच्या कृतीने मन जिंकलं VideoImage Credit source: Twitter/video grab
| Updated on: Aug 15, 2026 | 2:03 PM
Share

बॉलिवूड स्टार आणि ॲक्शन हिरो म्हणून ख्याती असलेल्या अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा केला. मुंबईत सकाळी क्रिकेट खेळत असताना या दोन्ही स्टार्संनी उत्स्फूर्त देशभक्ती दाखवत मैदानातच ध्वजारोहण सोहळा पार पाडला. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ नेहमीप्रमाणे सकाळी मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. स्वातंत्र्य दिन असल्याचं त्यांच्या लक्षात होतं. यावेळी खेळ रंगात आला असतानाच सामना थांबवला आणि स्वातंत्र्यदिन साजरा केला. मैदानाती ध्वजारोहणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अक्षय कुमारच्या कृतीचं कौतुक होत आहे.

भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनी मैदानात राष्ट्रध्वज आणल्यानंतर फडकवण्यासाठी कोणताही खांब नव्हता. अशा परिस्थितीत राष्ट्रध्वजाचा मान राखत अक्षय कुमारने प्रथम पायतले बूट काढले आणि तिरंगा हाती घेऊन एका खूर्चीवर उभा राहिला. अक्षय कुमारने राष्ट्रध्वज उंचावल्यानंतर टायगर श्रॉफसहित उपस्थित असलेल्या सर्वांनी सलामी दिली. त्यानंतर अभिमानाने राष्ट्रगीत गायलं. ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर स्टार्स इतरांनी क्रिकेट खेळाला पुन्हा सुरूवात केली.

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओखाली अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या असून कौतुक केलं आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ नुसते पडद्यावरचेच नाही तर खऱ्या आयुष्यात हिरो असल्याची प्रतिक्रिया काही युजर्संनी नोंदवली आहे.

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी आजवर अनेक देशभक्तीपर चित्रपटात काम केलं आहे. अक्षय कुमारचे केसरी, एअरलिफ्ट, बेबी, रूस्तम, मिशन मंगल, हॉलिडे असे अनेक चित्रपट रुपेरी पडद्यावर गाजले आहे. टायगर श्रॉफने त्याच्या हाय-व्होल्टेज ॲक्शन स्टाईलचा वापर करून देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या भूमिका साकारल्या आहेत.

Follow Us
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...