वयाच्या 55 व्या वर्षीही अक्षय कुमारचा जबरदस्त वर्कआऊट; Video पाहून चाहते थक्क!

अक्षय कुमारचा वर्कआऊट व्हिडीओ पाहून टायगर श्रॉफलाही बसला आश्चर्याचा धक्का!

वयाच्या 55 व्या वर्षीही अक्षय कुमारचा जबरदस्त वर्कआऊट; Video पाहून चाहते थक्क!
Akshay KumarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 4:46 PM

मुंबई- अभिनेता अक्षय कुमार त्याच्या फिटनेससाठी खूप प्रसिद्ध आहे. नुकताच त्याने सोशल मीडियावर वर्कआऊटचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो मंकी बार एक्सरसाइज करताना दिसतोय. हा व्यायाम करताना त्याची चपळाई आणि ताकद पाहून चाहते चकीत झाले आहेत. अभिनेता टायगर श्रॉफनेही अक्षयच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांना त्याला आपला ‘आदर्श’ म्हटलंय.

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये अक्षयने अत्यंत चपळाईने एका बारवरून दुसऱ्या बारवर पाच वेळा उडी मारली आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला त्याने कैलाश खेरचं ‘चक लैन दे’ गाणं लावलं आहे.

हे सुद्धा वाचा

‘ज्या दिवसाची सुरुवात अशी होते, तीच माझी सर्वोत्कृष्ट सकाळ असते, तुमची?,’ असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. टायगरने या व्हिडीओवर कमेंट करत आश्चर्य व्यक्त केला आहे. ‘आपला हिरो अजूनही तगडा आहे’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘तू खरंच 55 वर्षांचा आहेस का’, असा सवाल दुसऱ्याने केला.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षयचा राम सेतू हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. आतापर्यंत या चित्रपटाने 50 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या अक्षयच्या चित्रपटांपेक्षा ‘राम सेतू’ने ठीकठाक कमाई केली आहे. 2022 मध्ये बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन आणि राम सेतू हे अक्षयचे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. तर त्याचा कटपुतली हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला. राम सेतूमध्ये अक्षयसोबतच जॅकलिन फर्नांडिस आणि नुशरत भरूचा यांनीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

आगामी काळात अक्षयचा सेल्फी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत इमरान हाश्मी झळकणार आहे. याशिवाय सूर्याच्या ‘सूराराई पोट्रू’ या दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही तो मुख्य भूमिका साकारणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.