KBC 18 : बायको, मुलं नाही… अक्षय कुमारच्या वॉलेटमध्ये कोणाचा फोटो ? पाहून अमिताभही झाले हैराण
KBC 18: 'कौन बनेगा करोडपती'चा सध्या 18 वा सीझन सुरू आहे. नुकतंच या शोमध्ये गेलेल्या अक्षय कुमारने एक मोठा खुलासा केला. त्याने त्याचं वॉलेट दाखवताच बिग बी देखील हैराण झाले.

Kaun Banega Crorepati 18 : भारतातला सर्वात लोकप्रिय रिॲलिटी क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’चा सध्या 18 वा सीझन सुरू आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे गेल्या अनेक वर्षआंपासून हाँ शो होस्ट करत आहे. या शोचा फॉर्मॅट आणखी रंजक बनवण्यासाठी यावर्षी काही बदल करण्यात आले आहेत. लाइफलाइन्ससोबतच गेमप्लेमध्ये नवे एलिमेंट्सदेखील ॲड करण्यात आलेहत. दरम्यान आपल्या आगामी ‘हैवान’ चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) हे नुकतेच अमिताभ यांच्या या शोमध्ये आले होते. 11 सप्टेंबर 2026 रोजी ‘हैवान’ हा थ्रिलर चित्रपट रिलीज होणार आहे. केबीसमध्ये आलेल्या अक्षय आणि सैफशी अमिताभ यांनी बऱ्याच गप्पा मारल्या. याचदरम्यान बोलता बोलता अमिताभ यांनी अक्षयला एक सावल विचारला. तुझ्या पर्समध्ये (वॉलेट) कोणाचा फोटो असतो ? असं त्यांनी विचारल्यावर अक्षयने तो फोटो दाखवला. मात्र त्या आधीच अमिताभ बच्चन घाबरले. असं नेमकं काय घडलं ?
सोनी टीव्हीने नुकतंच ऑफिशअल इन्स्टाग्राम अकाऊंवरून एक व्हिडीओ शेअर केला. हा प्रँक पाहून हसू आवरणार नाही, असशी कॅप्शनही त्यासोबत लिहीण्यात आली होती. अक्षय कुमारला खिलाडी कुमार असंही म्हटलं जातं आणि तो बऱ्याचदा मजेमजेत काही प्रँक्स करत असतो. आता अक्षयने ‘केबीसी 18’ मध्येही असंच काहीसं केलं. मात्र अक्षयची कृती पाहून सैफ अली खानही थक्क झाला.
अमिताभ बच्चन का घाबरले ?
केबीसीच्या मंचावर अमिताभ बच्चन यांच्या समोर अक्षय कुमार आणि सैफ अली खान, असे दोघे बसले होते. याच दरम्यान बिग बी अक्षयला म्हणाले – तू चार्ली चॅप्लिन यांचा मोठा फॅन आहेस, तुझ्या वॉलेटमध्ये त्यांचा फोटोही ठेवतोस ना.. त्यावर अक्षयने होकार्थी उत्तर देत आपण खूप मोठा फॅन असल्याचं सांगितलं. त्यावर बिग बी यांनी विचारलं – पर्स आहे तुझ्याकडे ? आम्हाला दाखव ना.. ते ऐकून अक्षय म्हणाला- सर तुमचा फोटो आहे. बिग बींनी विचारलं माझा फोटो ? त्यानंतर अक्षय लगेच त्याच्या खुर्चीवरून उठला आणि अमिताभ यांच्या निकट गेला. तिथे पोहोचून त्याने पर्स उघडताच, अचानक त्याला आग लागली. ते दृश्य पाहून सगळेच दचकले, हैराण झाले. अक्षय मात्र हसत होता.
View this post on Instagram
कधीकधी असं होतं, असं तो म्हणाला. त्यानंतर त्याने अमिताभ बच्चन यांचा तरूण वयातला फोटोही दाखवला. बिग बींनी त्याला थँक्यू म्हटलं आणि पुढे टोला मारला – तू तर आगीशी खेळतोस की.. ही मजा असल्याचं अक्षयने पुढे स्पष्ट केलं. हा प्रँक खूपच चर्चेत होता.
